Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची दादागिरी, भाविकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण; Video Viral
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकाकडून भाविकाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडिओ पाहून चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नाशिक: देशातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची रिघ लागते. या मैदानामध्ये फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर, इतरत्र राज्यांतूनही मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या सुट्टीचे दिवस आहेत. या दिवसांमध्ये त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. अशातच सध्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरातील काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. घडलेली घटनापाहून भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
अनेकदा गर्दीच्या वेळी सुरक्षारक्षकांमध्ये आणि भाविकांमध्ये जोरदार वाद होतानाच्या घटना आपण पाहिल्या आहेत. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये भाविकांमध्ये आणि सुरक्षा रक्षकांमध्ये तुंबड हाणामारी झाली आहे. दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या एका भाविकाला सुरक्षा रक्षकांकडून ढकलाढकली करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचे दोन व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंदिरातील घटनेचा व्हिडिओ पाहून भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
advertisement
मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या काही भाविकांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट करून घेत त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सध्या मंदिरातल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. जर मंदिरामध्येच भाविकांना योग्य ती वागणूक मिळत नसेल, तर कसं काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शनिवार, रविवार, सोमवारी होळी आणि मंगळवारी धुलिंवदन असे सलग चार दिवस सुट्ट्या आल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
advertisement
भाविकांची त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये एकच गर्दी झाल्यामुळे भाविकांना रांगेत उभे राहण्यासाठी जमत नाहीये. गर्दी वाढल्यामुळे मंदिराच्या व्यवस्थापनावर ताण वाढला आहे. मंदिरामध्ये सुरक्षा रक्षकांकडून भाविकांसोबत उद्धटपणे वागणं, ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा मंदिरामध्ये उद्धटपणे भाविकांना वागणूक मिळाली आहे. दरम्यान, अनेक भाविकांकडून गर्दी नियंत्रण करताना भाविकांशी गैरवर्तन होणे योग्य नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घडलेल्या प्रकरावर मंदिर प्रशासन काय म्हणतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय, भाविकांकडून या प्रकरणी सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 9:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरात सुरक्षा रक्षकांची दादागिरी, भाविकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण; Video Viral








