advertisement

T20 World Cup : सूर्याला असा गोल्डन चान्स पुन्हा मिळणार नाही, सेमी फायनलच्या 72 तास आधी टीम इंडियाला गूड न्यूज!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 5 विकेटने विजय मिळवला. याचसोबत टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये त्यांचं स्थान निश्चित केलं आहे, पण सेमी फायनलआधीच टीम इंडियाला गूड न्यूज मिळाली आहे.
1/9
टी-20 वर्ल्ड कपच्या सुपर-8च्या शेवटच्या सामन्यामध्ये टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 5 विकेटने विजय मिळवला. वेस्ट इंडिजने दिलेल्या 196 रनच्या आव्हानाचा पाठलाग टीम इंडियाने 19.2 ओव्हरमध्ये केला.

2/9
संजू सॅमसन भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. संजूने 50 नाबाद 97 रन केले. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातला भारतीय खेळाडूचा हा सर्वोत्तम स्कोअर आहे. तसंच टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताने एवढ्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला.

3/9
वेस्ट इंडिजविरुद्धच्या या विजयामुळे टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे. गुरूवार 5 मार्चला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सेमी फायनलची लढत होईल.

4/9
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या सेमी फायनलआधी टीम इंडियाला गूड न्यूज मिळाली आहे. सेमी फायनलच्या दोन्ही लढती निश्चित झाल्यामुळे आता या सामन्यांमध्ये अंपायर कोण असणार? हेदेखील स्पष्ट झालं आहे.

5/9
भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या सामन्यात रिचर्ड कॅटलब्रो हे अंपायर नसतील. कॅटलब्रो हे इंग्लंडचे आहेत आणि आयसीसीच्या नियमांनुसार आयसीसी स्पर्धांमध्ये प्रत्येक सामन्यात न्यूट्रल (तिसऱ्या देशाचा) अंपायर असतो.

6/9
2014 पासून रिचर्ड कॅटलब्रो हे टीम इंडियाच्या 9 नॉक आऊट सामन्यांमध्ये अंपायर होते, यातल्या 8 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कॅटलब्रो ऑन फिल्ड अंपायर होते, हा सामना टीम इंडियाने गमावला.

7/9
रविवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कॅटलब्रो टीव्ही अंपायर होते, ज्यात भारताने विजय मिळवला. तर 2024 टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्येही कॅटलब्रो टीव्ही अंपायर होते, ज्यात टीम इंडियाने ट्रॉफी जिंकली.

8/9
2014 टी-20 वर्ल्ड कप फायनल, 2015 वनडे वर्ल्ड कप सेमी फायनल, 2016 टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनल, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वनडे वर्ल्ड कप सेमी फायनल या 5 नॉक आऊट सामन्यांमध्ये कॅटलब्रो ऑन फिल्ड अंपायर होते, ज्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला.

9/9
2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल, 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि 2023 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रिचर्ड कॅटलब्रो थर्ड अंपायर होते, या सामन्यांमध्येही टीम इंडियाचा पराभव झाला होता.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement