आज होणार होलिका दहन! पण 3 की 4 मार्च, रंगाची होळी कधी खेळली जाणार? कन्फ्युजन सोडा, नोट करा अचूक डेट
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
रंगांचा सण होळी दोन दिवस साजरा केला जातो. एका दिवशी होळी दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांनी होळी खेळली जाते. प्रदोष काळात फाल्गुन पौर्णिमेला होळी दहन करण्याची प्रथा आहे, तर दुसऱ्या दिवशी लोक रंगांनी होळी खेळतात.
Holi 2026 : रंगांचा सण होळी दोन दिवस साजरा केला जातो. एका दिवशी होळी दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांनी होळी खेळली जाते. प्रदोष काळात फाल्गुन पौर्णिमेला होळी दहन करण्याची प्रथा आहे, तर दुसऱ्या दिवशी लोक रंगांनी होळी खेळतात. परंतु 2026 मध्ये होळीच्या तारखेबाबत बराच गोंधळ आहे. प्रत्यक्षात, 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण झाल्यामुळे हे घडत आहे. होळी दहनानंतरच्या दिवशी रंगांनी होळी खेळण्याची परंपरा असली तरी, यावर्षी असा योगायोग घडत नाही.
3 की 4 मार्च, कधी खेळली जाणार रंगाची होळी?
सामान्यतः होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी होते. मात्र, 2026 मध्ये खगोलशास्त्रीय आणि धार्मिक कारणांमुळे तारखेत बदल झाला आहे. 3 मार्च 2026 रोजी वर्षातील पहिले खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण भारतात दिसणार असल्याने त्याचे धार्मिक नियम लागू होतात. ग्रहणाचा सूतक काळ 3 मार्चच्या पहाटे 6 वाजून 20 मिनिटांपासून सुरू होईल आणि सायंकाळी 6 वाजून 48 मिनिटांपर्यंत राहील.
advertisement
संतांचा आणि शास्त्राचा सल्ला
वृंदावनचे श्री प्रेमानंदजी महाराज आणि अनेक पंचांगकर्त्यांनुसार, ग्रहण काळ हा आनंदाचा किंवा रंगात न्हाऊन निघण्याचा काळ नसून तो ईश्वराच्या साधनेचा काळ आहे. ग्रहणाच्या सूतक काळात आनंदाचे उत्सव साजरे करणे किंवा रंगांशी खेळणे शास्त्राने निषिद्ध मानले आहे. प्रेमानंद महाराजांच्या मते, ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. रंगांच्या उत्सवात आपण बाहेर पडतो, एकमेकांना स्पर्श करतो आणि आरडाओरडा करतो. ग्रहण काळात आपली रोगप्रतिकारशक्ती आणि मानसिक स्थिती संवेदनशील असते. अशा वेळी रंग खेळल्याने किंवा बाहेर पडल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
advertisement
नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी
असे मानले जाते की ग्रहण काळात वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते. अशा वेळी रंगांच्या धुंदीत घराबाहेर पडणे आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक शांततेसाठी हानिकारक ठरू शकते. म्हणूनच, 3 मार्चचा दिवस शांत राहून नामस्मरणात घालवण्याचा सल्ला दिला जातो. धार्मिक आणि वैज्ञानिक अशा दोन्ही कारणांमुळे 3 मार्च ऐवजी 4 मार्च 2026 हा दिवस रंग खेळण्यासाठी सर्वोत्तम आहे.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 8:01 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
आज होणार होलिका दहन! पण 3 की 4 मार्च, रंगाची होळी कधी खेळली जाणार? कन्फ्युजन सोडा, नोट करा अचूक डेट









