इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचे 3 जवान शहीद; मी मृत्यूचा बदला घेणार; ट्रम्प यांनी घेतली शपथ, Iranमध्ये सैन्य घुसवणार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Donald Trump on Iran War:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणविरोधात मोठी लष्करी कारवाई लवकरच होणार असल्याचे सूचित करत आक्रमक इशारा दिला आहे. गरज भासल्यास अमेरिकन भूदल इराणमध्ये पाठवण्याचा पर्यायही खुला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील कारवाईबाबत आक्रमक भूमिका व्यक्त केली आहे. आम्ही अजून त्यांच्यावर जोरदार हल्ला करण्यास सुरुवात केलेली नाही. युद्धाची मोठी लाट अजून आलेलीच नाही. ती मोठी कारवाई लवकरच होणार आहे, असे त्यांनी CNN ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, गरज भासल्यास अमेरिकन भूदल (ग्राउंड ट्रूप्स) इराणमध्ये पाठवण्याचा पर्याय विचारात जाईल. जर ते आवश्यक असेल तर आम्ही तो निर्णय घेऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
New York Post शी बोलताना ट्रम्प म्हणाले, नेतृत्वाच्या बाबतीत आम्ही वेळापत्रकाच्या खूप पुढे आहोत. 49 जण ठार झाले आणि आम्हाला वाटले होते की हे साध्य करायला किमान चार आठवडे लागतील; पण आम्ही ते एका दिवसात केले. ते पुढे म्हणाले, आम्ही ते पूर्णपणे संपवू. काहीही असो जसे इतर गोष्टी करतो तसेच आम्ही ते नष्ट करू. ट्रम्प यांच्या या वक्तव्यांमुळे अमेरिका-इराण तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
advertisement
अमेरिकी जवान शहीद
लढाऊ कारवाया सध्या पूर्ण ताकदीने सुरू आहेत आणि आमची सर्व उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत त्या सुरूच राहतील. त्यांनी दोन आठवड्यांपूर्वी काहीतरी करू शकले असते, पण ते तसे करू शकले नाहीत, असे X वर पोस्ट केलेल्या व्हिडिओ पोस्टमध्ये ट्रम्प यांनी म्हटले.
त्याआधी United States Central Command (CENTCOM) ने माहिती दिली की, तीन अमेरिकी लष्करी जवान कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. एक राष्ट्र म्हणून आपण त्या खऱ्या अमेरिकन देशभक्तांसाठी शोक व्यक्त करतो, ज्यांनी आपल्या देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले.
advertisement
— Donald J. Trump (@realDonaldTrump) March 2, 2026
ट्रम्प पुढे म्हणाले की ज्या धर्मनिष्ठ मिशनसाठी त्यांनी आपले प्राण दिले, ते आम्ही पुढे चालू ठेवत आहोत. जखमींच्या पूर्ण बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांना आमचे अपार प्रेम आणि शाश्वत कृतज्ञता व्यक्त करतो. दुर्दैवाने पुढेही अशा घटना घडण्याची शक्यता आहे.
advertisement
अमेरिका त्यांच्या मृत्यूचा बदला घेईल आणि सभ्यतेविरुद्ध युद्ध छेडणाऱ्या दहशतवाद्यांवर सर्वात कठोर प्रहार करेल. आमचा निर्धार तसेच Israel चा निर्धार यापूर्वी कधीही इतका मजबूत नव्हता, असे ते म्हणाले.
United States आज पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात शक्तिशाली राष्ट्र बनले आहे. पण आपण ज्या जीवनमानाचा, स्वातंत्र्याचा आणि सुरक्षेचा आनंद घेतो, त्यामागचे कारण म्हणजे आपण अशी कामे केली आहेत जी इतरांना करता आली नाहीत. आणि हे सर्व त्या योद्ध्यांमुळे शक्य झाले आहे, जे आपल्या शत्रूंशी लढण्यासाठी स्वतःचे प्राण अर्पण करण्यास तयार असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 9:42 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
इराणच्या हल्ल्यात अमेरिकेचे 3 जवान शहीद; मी मृत्यूचा बदला घेणार; ट्रम्प यांनी घेतली शपथ, Iranमध्ये सैन्य घुसवणार









