Arjun Tendulkar : वैभवने जेवढ्या रन केल्या, तेवढ्या अर्जुनने एका ओव्हरलाच दिल्या, तेंडुलकरची टीम शॉक!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
येत्या काही दिवसांमध्ये अर्जुन तेंडुलकर विवाह बंधनात अडकणार आहे. लग्नाची तयारी सुरू असताना अर्जुन डीवाय पाटील टी-20 स्पर्धेत खेळत आहे.
मुंबई : येत्या काही दिवसांमध्ये अर्जुन तेंडुलकर विवाह बंधनात अडकणार आहे. लग्नाची तयारी सुरू असताना अर्जुन डीवाय पाटील टी-20 स्पर्धेत खेळत आहे. अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी या स्पर्धेत एकाच टीमकडून खेळत आहेत. अर्जुन आणि वैभव या स्पर्धेत डीवाय पाटील ब्लू टीमचे प्रतिनिधित्व करत आहेत. 2 मार्चला डीवाय पाटील ब्लू चा सामना कॅनरा बँकविरुद्ध झाला. या सामन्यात वैभव आणि अर्जुनच्या टीमला पराभवाचा धक्का बसला. वैभव सूर्यवंशीने त्याच्या इनिंगमध्ये जितक्या रन केल्या तितक्या अर्जुनने त्याच्या एका ओव्हरमध्येच दिल्या.
20 मिनिटांमध्ये 20 रन
कॅनरा बँकेविरुद्धच्या सामन्यात डीवाय पाटील ब्लूने पहिले बॅटिंग केली. पण, त्यांची कामगिरी इतकी खराब होती की त्यांना 20 ओव्हर खेळणे देखील कठीण झाले. डीवाय पाटील ब्लू टीम फक्त 17.2 ओव्हरमध्ये 136 रनवर ऑलआउट झाली. डीवाय पाटील ब्लू कडून वैभव सूर्यवंशीने डावाची सुरुवात केली. पण, त्याच्या 20 मिनिटांच्या खेळीत, वैभव 20 पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. त्याने 14 बॉलचा सामना केला आणि 4 फोरच्या मदतीने 146 च्या स्ट्राईक रेटने या रन केल्या.
advertisement
वैभव आणि अर्जुन एकत्र हिट आणि फ्लॉप
अर्जुन तेंडुलकर देखील बॅटने अपयशी ठरला. तो 8 बॉलमध्ये फक्त 5 रन करू शकला. डीवाय पाटील टी-20 स्पर्धेच्या भारतीय नौदलाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात, वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर दोघांनीही अर्धशतके झळकावली होती. त्यांनी मिळून टीमसाठी 48 बॉलमध्ये 118 रन केल्या होत्या. पण, कॅनरा बँकेविरुद्ध, दोघेही बॅटने अपयशी ठरले.
advertisement
अर्जुनने एका ओव्हरमध्ये लुटल्या रन
कॅनरा बँकेविरुद्ध अर्जुन तेंडुलकरची बॉलिंगची कामगिरी त्याच्या बॅटिंगपेक्षाही वाईट होती. तो त्याच्या चार ओव्हरपैकी फक्त एकच ओव्हर बॉलिंग करू शकला. कारण त्या एका ओव्हरमध्ये त्याची खूप धुलाई झाली. अर्जुन तेंडुलकरने एकाच ओव्हरमध्ये 19 रन दिल्या.
टीमचा पराभव
डीवाय पाटील ब्लूने दिलेल्या 137 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कॅनरा बँकेने 12 व्या ओव्हरमध्ये विजय मिळवला. त्यांनी 11.2 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 139 रन केल्या. डीवाय पाटील ब्लू टीमचा दोन सामन्यांमधील हा पहिलाच पराभव आहे.
Location :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 11:52 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Arjun Tendulkar : वैभवने जेवढ्या रन केल्या, तेवढ्या अर्जुनने एका ओव्हरलाच दिल्या, तेंडुलकरची टीम शॉक!








