T20 World Cup : भारत-इंग्लंड सेमी फायनल रद्द झाली तर... फायनलमध्ये कोण जाणार? ICC ने क्लिअर केलाय नियम!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कप 2026 ची पहिली सेमी फायनल दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. तर भारत-इंग्लंड दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भिडतील.
कोलकाता : टी-20 वर्ल्ड कप 2026 ची पहिली सेमी फायनल दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. हा सामना 4 मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 च्या ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान मिळवून सेमी फायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले. दरम्यान, न्यूझीलंडने ग्रुप बी मध्ये दुसरे स्थान मिळवून सेमी फायनलमध्ये पोहोचली. जर या दोन्ही टीममधील सेमी फायनलचा सामना रद्द झाला तर फायनलला कोणती टीम पोहोचणार? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात आहे.
काय आहे आयसीसीचा नियम?
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमी फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पावसामुळे ठरलेल्या दिवशी सामना झाला नाही तर राखीव दिवशी हा सामना होईल, पण राखीव दिवशीही मॅच होऊ शकली नाही तर मात्र सामना रद्द केला जाईल. आयसीसीच्या नियमांनुसार, जर सेमी फायनलचा सामना रद्द झाला तर दक्षिण आफ्रिकेला फायनलचे तिकीट मिळेल.
advertisement
आयसीसीच्या नियमांनुसार, सेमी फायनल रद्द झाल्यास, त्यांच्या ग्रुपमधील अव्वल स्थानावर असलेल्या टीमला फायनलचे तिकीट दिले जाईल. दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडविरुद्ध हा फायदा आहे कारण त्यांनी सुपर 8 च्या ग्रुपमध्ये अव्वल स्थान पटकावले होते, तर न्यूझीलंड त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकाची टीम होती.
भारत-इंग्लंड सेमी फायनलचं काय?
भारत-इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या सेमी फायनलसाठीही हाच नियम राहिल. गुरूवार 5 मार्चला होणाऱ्या या सामन्यासाठीही राखीव दिवस आहे, पण त्यादिवशीही सामना झाला नाही तर मॅच रद्द केली जाईल आणि सुपर-8 च्या ग्रुपमध्ये अव्वल टीमला फायनलमध्ये पाठवलं जाईल. टीम इंडिया ही त्यांच्या ग्रुपमध्ये दुसऱ्या आणि इंग्लंड पहिल्या क्रमांकावर राहिली त्यामुळे मॅच रद्द झाली तर इंग्लंड फायनलला जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 11:34 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : भारत-इंग्लंड सेमी फायनल रद्द झाली तर... फायनलमध्ये कोण जाणार? ICC ने क्लिअर केलाय नियम!








