advertisement

Bigg Boss Marathi 6 : माझ्या संस्कारात हे बसत नाही! पहिल्याच दिवशी ढसाढसा रडली संस्कृती

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Sanskruti Sakunke : बिग बॉस मराठी 6 च्या घरात पहिल्या दिवशी संस्कृती साळुंकेसोबत असं काय घडलं की ती ढसाढसा रडू लागली.
1/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री घेतल्यानंतर तिन्ही सदस्यांना पॉवर की कॅप्टन्सीपदाची उमेदवारी मिळाली होती. इतकंच नव्हे तर बिग बॉसच्या घराचं रूपांतर बीबी हॉटेलमध्ये करून या तिन्ही वाइल्ड कार्ड सदस्यांना व्हीव्हीआयपी गेस्ट आणि घरातील सदस्यांपैकी दोघांना सेवक आणि दोघांना पहारेकरी बनवण्यात आलं. त्यामुळे तिघंही खूप आनंदात होते. अगदी उत्साहात त्यांनी बीबी हॉटेलमध्ये एंट्री घेतली आणि येताच राडा घालायला सुरुवात केली.

2/7
पण त्यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटला. संस्कृती साळुंके तर पहिल्याच दिवशी ढसाढसा रडली आहे आणि याचं कारण ठरला तो विशाल. विशालने संस्कृती पॉवर की चोरली आणि ती अशा ठिकाणी लपवली की ती काढूनही घेऊ शकत नव्हती.

3/7
संस्कृती विशालकडून पॉवर की पुन्हा मिळवण्याचा खूप प्रयत्न करते. ती रात्रभर स्वत: झोपत नाही आणि विशाललाही झोपू देत नाही. त्याच्यावर पाणी टाकते, बेड हलवते, कानाजवळ खलबत्ता वाजवून त्याला जागं ठेवण्याचा प्रयत्न करते. पण काही केल्या विशाल काही पॉवर की देत नाही.

4/7
शेवटी संस्कृती हरते. ती तन्वीकडे जाते आणि तिच्यासमोर आपल्या भावना व्यक्त करते. पँटमध्ये गोष्टी टाकतोय तो. मी काय करू सांग. माझ्या कुठल्याच संस्कारात हे बसत नाही. माझी बघायचीपण हिंमत नाही होत. मी नाही मस्करी करत, मी नाही याच्या फॅमिलीमधून येते, असं ती तन्वीला सांगते.

5/7
नंतर बिग बॉस वाइल्ड कार्ड सदस्यांना आपली पॉवर की दाखवायला सांगता. तेव्हा रेवा आणि संकेत पॉवर की दाखवतात. पण संस्कृतीकडे पॉवर की नसते. ती पॉवर की सांभाळून ठेवू शकली नाही याबाबत बिग बॉसही नाराजी व्यक्त करतात. संस्कृती पॉवर कीची इम्युनिटी आणि कॅप्टन्सीपदाची उमेदवारी गमावून बसते. ती विशालकडे पॉवर की असल्याने त्याला मिळते. त्याला आता कोणी नॉमिनेट करू शकत नाही.

6/7
संस्कृतीच्या या चुकीची शिक्षा फक्त शिक्षा इतर दोन्ही वाइल्ड कार्ड सदस्यांनाही मिळते. संस्कृतीसह त्यांना बीबी हॉटेलमध्ये व्हीव्हीआयपी गेस्ट म्हणून मान मिळालेला असतो, तो काढून घेतला जातो. तसंच त्यांचे दोन्ही सेवक तन्वी, विशाल आणि दोन्ही पहारेकरी रुचिता, सागर यांना त्यांच्या सेवेतून मुक्त केलं जातं.

7/7
संस्कृतीला तिच्या कृत्याचा खूप पश्चाताप होतो. बिग बॉस तिला बोलायची संधी देतात. तेव्हा संस्कृती म्हणते,  मी खूप प्रयत्न केले, पण प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. संधी माझ्या हातात होती ती नाही आहे, असं म्हणून ती ढसाढसा रडायलाच लागते.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement