advertisement

घरकुलासाठी आधीच अर्ज केलाय पण लाभार्थी यादीत नाव आलं आहे की नाही? ५ मिनिटांत करा चेक

Last Updated:

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सुरक्षित आणि पक्के घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रभावीपणे राबवली जात आहे.

Gharkul Yojana
Gharkul Yojana
मुंबई : ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना सुरक्षित आणि पक्के घर मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्रभावीपणे राबवली जात आहे. महाराष्ट्रासह देशभरात या योजनेअंतर्गत शेतकरी, शेतमजूर, बांधकाम कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील हजारो कुटुंबांना घरबांधणीसाठी थेट आर्थिक मदत दिली जात आहे.
गेल्या काही वर्षांत या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात झाला असला तरी अजूनही अनेक नागरिकांना आपण लाभार्थी आहोत की नाही, याची खात्री नसते. ही अडचण दूर करण्यासाठी सरकारने लाभार्थी यादी ऑनलाइन तपासण्याची सोपी आणि पारदर्शक पद्धत उपलब्ध करून दिली आहे.
लाभार्थी यादी कशी तपासाल?
घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून लाभार्थी यादी पाहता येते. यासाठी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ https://pmayg.nic.in किंवा https://pmaymis.gov.in
advertisement
उघडावे. मुख्य पानावर “AwaasSoft” या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर “Reports” विभागात जाऊन “Social Audit Reports” हा पर्याय निवडावा. पुढे “Beneficiary Details for Verification” या लिंकवर क्लिक केल्यावर नवीन MIS रिपोर्ट विंडो उघडते.
या विंडोमध्ये राज्य म्हणून ‘महाराष्ट्र’ निवडावे. त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडावे. संबंधित आर्थिक वर्ष (उदा. 2023-24) आणि योजना प्रकार ‘PMAY-G’ निवडून कॅप्चा कोड भरावा. शेवटी ‘Submit’ किंवा ‘Get Report’ या बटणावर क्लिक केल्यावर संबंधित गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी स्क्रीनवर दिसते.
advertisement
या यादीमध्ये लाभार्थ्याचे नाव, घर मंजुरी क्रमांक, तसेच घरबांधणीची सध्याची स्थिती (पहिला टप्पा, दुसरा टप्पा किंवा पूर्ण) याची सविस्तर माहिती उपलब्ध असते. त्यामुळे अर्जदारांना त्यांच्या घरकुलाच्या प्रगतीची माहिती पारदर्शकपणे मिळते.
घरकुल योजना का महत्त्वाची?
स्वतःचे सुरक्षित आणि पक्के घर असणे हे प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. ग्रामीण भागात अजूनही अनेक कुटुंबे कच्च्या किंवा अर्धवट बांधकाम असलेल्या घरात राहतात. नैसर्गिक आपत्ती, पावसाळा आणि उन्हाळ्यात अशा घरांमध्ये राहणे धोकादायक ठरते. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महत्त्वाची ठरते.
advertisement
या योजनेत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ग्रामपंचायत यांचा समन्वय साधून लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. अनुदान तीन टप्प्यांत वितरित केले जाते. पहिल्या टप्प्यात घर मंजुरीनंतर प्रारंभिक रक्कम दिली जाते. दुसऱ्या टप्प्यात बांधकाम सुरू असताना पुढील हप्ता दिला जातो, तर अंतिम टप्प्यात घर पूर्ण झाल्यानंतर उर्वरित रक्कम जमा केली जाते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घरकुलासाठी आधीच अर्ज केलाय पण लाभार्थी यादीत नाव आलं आहे की नाही? ५ मिनिटांत करा चेक
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement