advertisement

ग्राउंडवर स्पाय, आख्खं तेहरान केलं हॅक, प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष, इस्त्रायलने खामेनेईंना कसं मारलं? हादरवून सोडणारी Inside Story

Last Updated:

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येसाठी इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त कारवाईचे अत्यंत धक्कादायक तपशील आता समोर आले आहेत.

News18
News18
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येसाठी इस्रायल आणि अमेरिकेने केलेल्या संयुक्त कारवाईचे अत्यंत धक्कादायक तपशील आता समोर आले आहेत. 'फायनान्शिअल टाइम्स' या लंडनस्थित वृत्तपत्राने दिलेल्या अहवालानुसार, इस्रायलची गुप्तचर संस्था 'मोसाद'ने इराणच्या सुरक्षा यंत्रणेत इतक्या खोलवर शिरकाव केला होता की, खामेनेई यांना सावरण्याची संधीही मिळाली नाही.

तेहरानचे ट्रॅफिक कॅमेरे आणि मोबाईल नेटवर्क हॅक

अहवालात दावा करण्यात आला आहे की, इस्रायलने गेल्या अनेक वर्षांपासून तेहरानमधील जवळपास सर्वच ट्रॅफिक कॅमेरे हॅक केले होते. या कॅमेऱ्यांचे फुटेज गुप्त कोडमध्ये (एन्क्रिप्टेड) थेट तेल अवीव आणि दक्षिण इस्रायलमधील सर्व्हरवर पाठवले जात होते. या फुटेजच्या मदतीनं खामेनेई यांचे बॉडीगार्ड त्यांच्या गाड्या कुठे पार्क करतात आणि पाश्चर स्ट्रीटवरील सरकारी इमारतींमधील हालचाली काय आहेत, याची इत्यंभूत माहिती इस्रायलला मिळत होती.
advertisement

मोबाईल टॉवर्समध्ये बिघाड

हल्ल्याच्या काही वेळ आधी इस्रायलने पाश्चर स्ट्रीटजवळील डझनभर मोबाईल टॉवर्सचे पार्ट्स खराब केले, ज्यामुळे सुरक्षा रक्षकांना धोक्याची सूचना देणारे कॉल्स करता आले नाहीत. एवढंच नव्हे तर इस्रायलच्या 'युनिट ८२००' आणि लष्करी गुप्तचर विभागाने गुंतागुंतीच्या अल्गोरिदमचा वापर करून खामेनेई यांच्या सुरक्षा ताफ्यातील प्रत्येक कमांडोची कुंडली काढली होती.
कोणत्या कमांडोचा पत्ता काय आहे? त्याच्या ड्युटीचे तास कोणते? तो कामावर कोणत्या रस्त्याने जातो? कोणत्या नेत्याची सुरक्षा कोणाकडे आहे? या सर्व डेटाचे विश्लेषण करून इस्रायलने एक 'इंटेलिजेंस पिक्चर' तयार केले होते. याचाच वापर करून इस्त्रायलने अचूकपणे आपल्या टार्गेटवर हल्ला केला.
advertisement
advertisement

अमेरिकन एजंटचा 'ग्राउंड सिग्नल'

हल्ल्याच्या दिवशी खामेनेई आणि इतर उच्चपदस्थ अधिकारी कंपाऊंडमध्ये उपस्थित असल्याची खात्री करण्यासाठी इस्रायलने 'सोशल नेटवर्क अनालिसिस' चा वापर केला. अब्जावधी डेटा पॉइंट्समधून माहिती गाळून टार्गेट निश्चित करण्यात आलं. मात्र, अंतिम खात्री एका अमेरिकन हेराने दिली. तेहरानमध्ये जमिनीवर उपस्थित असलेल्या या एजंटने सिग्नल दिल्यानंतरच ड्रोन हल्ल्याचा आदेश देण्यात आला आणि संपूर्ण कॅम्पस उद्ध्वस्त झाला.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
ग्राउंडवर स्पाय, आख्खं तेहरान केलं हॅक, प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष, इस्त्रायलने खामेनेईंना कसं मारलं? हादरवून सोडणारी Inside Story
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement