advertisement

Success Story : 3 वर्षांपूर्वी घरीच सुरुवात, अलका यांचा कवठ जाम विक्री व्यवसाय भारीच, महिन्याला एवढी कमाई

Last Updated:

3 वर्षांपासून कवठ जाम बनवण्याचं आणि विक्री करण्याचं काम करत आहेत. या माध्यमातून महिन्याला 80 हजार रुपयांची कमाई अलका जाधव यांची होत असते.

+
“कवठ

“कवठ जाम”मधून महिन्याला 80 हजारांची कमाई; पैठणच्या अलका जाधव यांची यशोगाथा..! 

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील म्हारोळा येथील अलका जाधव या गेल्या 3 वर्षांपासून कवठ जाम बनवण्याचं आणि विक्री करण्याचं काम करत आहेत. कवठ जाम बरोबरच चहा मसाला, घरगुती पितांबरी, विविध प्रकारच्या चटण्या, काळा आणि गरम मसाला, आमटी, ढोकळा आणि डाळ बट्टी यासाठी लागणारे सर्व साहित्य घरी बनवले जाते. तसेच त्या पदार्थांची विक्री मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात उमेद जीवन ज्योती अभियानांतर्गत विविध ठिकाणी स्टॉल लावले जातात, त्या माध्यमातून उत्पादनांची विक्री केली जाते. या माध्यमातून महिन्याला 80 हजार रुपयांची कमाई अलका जाधव यांची होत असते. याबरोबरच त्यांनी दोन महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला असल्याचे जाधव यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
व्यवसायाची सुरुवात कधी आणि कशी?
डाळबट्टीसाठी लागणारे पीठ आणि इतर साहित्य सुरुवातीच्या काळात आम्ही विक्री करत होतो. याबरोबरच 2023 मध्ये साधे कवठ स्टॉलवर विकण्यासाठी मुंबई येथे नेले. त्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यात देखील कवठाची विक्री सुरू होती. काही ग्राहकांकडून मागणी करण्यात आली की कवठापासून बनवलेला काहीतरी वेगळा पदार्थ द्या. त्यानंतर कवठ जाम बनवण्याचा आणि विक्री करण्याचा निर्णय घेतला आणि आजच्या घडीला कवठ जामची मोठ्या प्रमाणात किराणा दुकानदार, मॉल, तसेच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्री सुरू आहे.
advertisement
उत्पादने कसे तयार होते?
कवठ जाम बरोबरच चहा मसाला, घरगुती विविध भाज्यांसाठी लागणारे मसाले घरी स्वतः तयार करतो. त्यासाठी कच्च्या मटेरियलवर प्रक्रिया केली जाते. कच्चे मटेरियल भाजून घेतल्यानंतर गिरणीमध्ये त्याला दळले जाते. सर्व मसाले तयार झाल्यानंतर त्याची पॅकिंग घरीच केली जाते. या कामासाठी दोन महिला आणि पॅकेजिंग मशीन देखील आहे.
advertisement
इतर महिलांनी हा व्यवसाय करावा का?
इतर महिलांना कवठ जाम, विविध प्रकारचे मसाले बनवण्याचा व्यवसाय करायचा झाल्यास त्यांनी नक्की या व्यवसायात यावे. स्वतः सर्व कामे शिकून घ्यावीत. सुरुवातीला कमी गुंतवणुकीपासून हा व्यवसाय सुरू करावा. घरातले कामे करून देखील हा व्यवसाय आपण करू शकतो. उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या खर्चासाठी देखील हातभार या व्यवसायामुळे लागतो, असे देखील जाधव यांनी म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : 3 वर्षांपूर्वी घरीच सुरुवात, अलका यांचा कवठ जाम विक्री व्यवसाय भारीच, महिन्याला एवढी कमाई
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement