आता युद्ध थांबणार नाही, ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम, 7 आठवड्यांचा डेंजर प्लॅन
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिला असून अमेरिका, इस्रायल, बहरीन, कुवेत, कतार, युएई एकत्र इराणविरोधात उभे आहेत. हल्ल्यात भारतीय नागरिकही जखमी झाले आहेत.
"इराणला आम्ही सोडणार नाही, त्यांना धडा शिकवणार" अशा थेट इशारा आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. इराणसोबतच्या युद्धादरम्यान त्यांनी हा थेट इशारा दिला. सध्या अमेरिका आणि इराणमध्ये जे काही सुरू आहे, त्यावर ट्रम्प यांनी स्पष्ट केलंय की, हे युद्ध आता दोन-चार दिवसांचं नाही, तर पुढचे ७ आठवडे इराणला योग्य तो धडा शिकवणार. गरज पडल्यास संपूर्ण सैन्य उतरवणार असंही ते म्हणाले. ट्रम्प यांच्या धमकीमुळे जगभरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाकिस्तान-अफगाणिस्तान, रशिया युक्रेननंतर आता अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. त्याचे जगभरात पडसाद उमटत आहेत. ट्रम्प यांच्या म्हणण्यांनुसार, इराण शांत बसणारा नाही. ते अशी क्षेपणास्त्रं बनवत होते जी थेट अमेरिकेपर्यंत पोहोचून तिथे हल्ला करू शकतील. "गेल्या ४७ वर्षांपासून हे आमच्यासाठी डोकेदुखी ठरत आहेत, पण आता ही त्यांची शेवटची वेळ आहे," असं ट्रम्प यांनी ठणकावून सांगितलंय. इराणला अण्वस्त्रं बनवू देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे असंही ते म्हणाले.
advertisement
हे युद्ध कितीही लांबलं तरी चालेल पण जोपर्यंत इराणची अण्वस्त्र बनवण्याची ताकद आम्ही पूर्णपणे संपवत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही." गरज पडली तर आमचं सैन्य थेट इराणमध्ये शिरून कारवाई करेल, अशी धमकीच त्यांनी दिली आहे. आतापर्यंत जे अरब देश शांत होते, तेही आता अमेरिकेसोबत या युद्धात सामील झाले आहेत. बहरीन, कुवेत, कतार आणि युएई सारखे देश स्वतःहून इराणविरोधात लढायला तयार झालेत. कारण इराणनं या देशांनाही त्रास द्यायला सुरुवात केली होती. आता हे सगळे इराणविरोधात एकत्र लढत आहेत.
advertisement
इराणमधील अलीकडील हल्ल्यांमध्ये तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हल्ल्यांत जखमी झालेल्यांपैकी एक भारतीय गंभीर अवस्थेत असून व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 20 ते 25 भारतीय जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावासाच्या माध्यमातून जखमींना आवश्यक मदत पुरवली जात आहे. मृत्यूची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 6:50 AM IST







