advertisement

Saudi Aramco Attack: सौदी अरामकोवरील हल्ल्यात नवा ट्विस्ट! इराणनं केला इन्कार, रिफायनरीला कोणी केलं टार्गेट? युद्धात मोठी अपडेट

Last Updated:

सौदी अरेबियातील 'रास तनुरा' तेल रिफायनरीवर भीषण ड्रोन हल्ला झाला असून इराणने यात आपला हात असल्याचा इन्कार केला आहे.

Iran denies targeting Saudi oil facility
Iran denies targeting Saudi oil facility
नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठे तेल बंदर असलेल्या सौदी अरेबियातील 'रास तनुरा' येथील रिफायनरीवर (Ras Tanura) इराणने ड्रोन हल्ला केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या हल्ल्यानंतर रिफायनरी तात्काळ बंद करण्यात आली. सौदी अरामको ही जगातील महत्त्वाची रिफायनरी आहे. त्यामुळे या हल्ल्यामुळे अधिकच चिंता वाढली होती. अशातच आता या हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. इराणने या हल्ल्याचा इन्कार केला आहे. त्यामुळे इराणने जर हा केला नाही तर कोणी ड्रोन अॅटक केला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सॅटेलाईट फोटोंमधून समोर आले नुकसान

'व्हेन्टर'ने सोमवारी मिळवलेल्या सॅटेलाईट फोटोंनुसार, रास तनुरा येथील दोन मोठ्या प्रोसेसिंग युनिट्समध्ये लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये प्रकल्पातील कर्मचारी जीव वाचवण्यासाठी पळत असल्याचे दिसून आले होते.
advertisement

इराणने नेमकं काय म्हटले?

इराणने शेजारील देशांमधील अमेरिकेच्या तळावर हल्ले सुरू ठेवले आहेत. सौदी अरामको रिफायनरी हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचे इराणे म्हटले असल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी दिले आहे. हा इस्रायलचा 'फॉल्स फ्लॅग' (दुसऱ्याच्या नावावर हल्ला करणे) ऑपरेशनचा भाग असू शकतो, असा दावा इराणने केला आहे. "आम्ही या भागातील अमेरिकन आणि इस्रायली तळांना लक्ष्य करू असे स्पष्ट केले, परंतु अरामकोच्या (Aramco) सुविधा आमच्या लक्ष्यावर नव्हत्या," असे इराणच्या लष्करी सूत्रांनी सांगितले.
advertisement

जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम?

रास तनुरा हे केवळ एक रिफायनरी केंद्र नसून, जगातील सर्वात मोठे 'ऑफशोअर लोडिंग टर्मिनल' आहे. येथून मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची निर्यात केली जाते. सध्या 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) येथील टँकर वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे. रिकामे टँकर सध्या लोडिंगसाठी अरबी आखातात प्रवेश करत नसल्याने आगामी काळात तेल पुरवठ्यावर मर्यादा येण्याची शक्यता आहे.
advertisement

सौदी अरामको महत्त्वाचा का?

सौदी अरामको ही जगातील सर्वात मोठ्या तेल आणि वायू कंपन्यांपैकी एक आहे. ती सौदी अरेबिया सरकारच्या मालकीची आहे. अमेरिकन कंपन्यांशी झालेल्या करारानुसार १९३३ मध्ये ती स्थापन झाली. १९८० मध्ये, ती पूर्णपणे सौदी सरकारच्या नियंत्रणाखाली आली. कंपनीचे मुख्यालय धाहरान येथे आहे. अरामकोकडे जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यांपैकी एक आहे. सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था या कंपनीच्या महसुलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. अरामको केवळ कच्च्या तेलाचे उत्पादन करत नाही तर शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स आणि नैसर्गिक वायूमध्ये देखील गुंतलेली आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Saudi Aramco Attack: सौदी अरामकोवरील हल्ल्यात नवा ट्विस्ट! इराणनं केला इन्कार, रिफायनरीला कोणी केलं टार्गेट? युद्धात मोठी अपडेट
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement