advertisement

Kaliyuga: कलियुगाची आत्ताशी 5125 वर्षे उलटली, अजून 'इतकी' बाकी तरी! शरद उपाध्ये म्हणाले..

Last Updated:

Kaliyuga: प्रसिद्ध ज्योतिषी आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी कलियुगाच्या सद्यस्थितीवर अत्यंत गंभीर आणि अंतर्मुख करायला लावणारे विचार मांडले आहेत. भागवतात कलियुगाचे जे वर्णन केले आहे, ते आज तंतोतंत अनुभवास येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

News18
News18
मुंबई : सध्या समाजात घडत असलेल्या वाईट गोष्टींनी अनेकांना काळजी वाटणं साहजिक आहे. लोकांमध्ये अनैतिकता एवढी वाढलीय की, नैतिकतेने राहू-जगू इच्छिणारा माणूस जणू मूर्ख ठरू लागला आहे. प्रसिद्ध ज्योतिषी आणि राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी कलियुगाच्या सद्यस्थितीवर अत्यंत गंभीर आणि अंतर्मुख करायला लावणारे विचार मांडले आहेत. भागवतात कलियुगाचे जे वर्णन केले आहे, ते आज तंतोतंत अनुभवास येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
भागवतातील वर्णनाचा प्रत्यय - शरद उपाध्ये यांनी एक फेसबुक पोस्ट करून चिंता व्यक्त केली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, घोर कलियुग सुरू होऊन आता कुठे 5125 वर्षे झाली आहेत. अजून 4 लक्ष 26 हजार 875 वर्षे बाकी आहेत. कलियुगाच्या पहिल्याच चरणात मानवी क्रौर्याने सीमा ओलांडली आहे. माणसे क्रूर होतील, नास्तिक होतील, स्त्रियांशी गैरवर्तन करतील आणि लोक कर्तव्यच्युत होतील, हे भागवतातील भाकीत आज खरे ठरताना दिसत आहे.
advertisement
कोवळ्या जीवांवरील अत्याचाराने मन सुन्न - समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांचा उल्लेख करताना ते म्हणतात की, 9 वर्षांपर्यंतच्या कोवळ्या मुलींवर होणारे अत्याचार आणि मानवी तस्करी हे महाक्रौर्य पाहून मन सुन्न होते. लहान मुलामुलींना पळवून नेऊन त्यांचा छळ करणे, त्यांना विजेचे झटके देणे आणि त्यांच्या किंचाळण्याचा पाशवी आनंद घेण्यासारख्या विकृत घटनांचे व्हिडिओ पाहून मानवतेचा थरकाप उडतो. ही सर्व कुकर्मे पुढे फेडावी लागणार आहेत याची पर्वा आता कोणालाच उरलेली नाही, असे त्यांनी नमूद केले.
advertisement
श्रीहरीचे नामस्मरण हाच एकमेव आधार - कलियुगाच्या पहिल्या चरणात जर ही स्थिती असेल, तर पुढील तीन चरणांत काय भयावह परिस्थिती निर्माण होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या साऱ्या अनर्थापासून आणि नकारात्मकतेपासून वाचण्यासाठी श्रीहरीचे चरण घट्ट धरून चालणे, हाच सुरक्षित मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
श्रीहरीचे नामस्मरणच आपल्याला सुखरूप ठेवील. भज गोविंदम, भज गोविंदम, असा मंत्र देत त्यांनी आपल्या मित्र-मैत्रिणींना सात्त्विक मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. शरद उपाध्ये यांच्या या पोस्टवर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, अनेकांनी वाढत्या गुन्हेगारीवर आणि ढासळत्या मानवी मूल्यांवर चिंता व्यक्त केली आहे. माणूस म्हणून आपले वर्तन अधिक खराब होत आहे. नीतीमत्ता ठिकवणे ही काळाची गरज झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Kaliyuga: कलियुगाची आत्ताशी 5125 वर्षे उलटली, अजून 'इतकी' बाकी तरी! शरद उपाध्ये म्हणाले..
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement