IND vs ENG 2nd Semifinal : 41 वर्षानंतर पुन्हा तोच योगायोग, टीम इंडियासाठी इंग्लंड 'लकी चार्म', तिसऱ्यांदा येणार वर्ल्ड कपची ट्रॉफी!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
T20 World Cup 2026 semi finals : इतिहासाची पानं उलटली तर असं लक्षात येतं की, जेव्हा जेव्हा भारताने सेमी फायनलमध्ये इंग्रजांचा गर्व मोडीत काढला आहे, तेव्हा तेव्हा टीम इंडिया चॅम्पियन बनली आहे.
India vs England 2nd Semifinal : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 5 मार्च रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा टी-20 वर्ल्ड कपचा दुसरा सेमीफायनल मुकाबला केवळ खेळापुरता मर्यादित नाही. या मॅचसोबत एक असा अजब योगायोग जोडला गेला आहे, जो भारतीय चाहत्यांना तिसऱ्या वर्ल्ड कप ट्रॉफीचे स्वप्न दाखवत आहे. इतिहासाची पानं उलटली तर असं लक्षात येतं की, जेव्हा जेव्हा भारताने सेमी फायनलमध्ये इंग्रजांचा गर्व मोडीत काढला आहे, तेव्हा तेव्हा टीम इंडिया चॅम्पियन बनली आहे.
इंग्लंडला हरवून भारताने फायनल गाठली
या विजयाच्या समीकरणाची मुळे 1983 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये दडलेली आहेत, जेव्हा पहिल्यांदा हे दोन दिग्गज संघ सेमी फायनलमध्ये भिडले होते. त्याकाळी बलाढ्य मानल्या जाणाऱ्या इंग्लंडला हरवून भारताने फायनल गाठली आणि पुढे वेस्ट इंडिजवर विजय मिळवून पहिल्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. तो विजय भारतीय क्रिकेटसाठी एक टर्निंग पॉईंट ठरला होता, ज्याने क्रिकेटचे भविष्य बदलले.
advertisement
41 व्या वर्षी पुन्हा तोच प्रसंग
बरोबर 41 वर्षांनंतर, 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा हाच योगायोग पाहायला मिळाला होता. सेमी फायनलमध्ये भारताने इंग्लंडला धूळ चारली आणि त्यानंतर फायनल जिंकून पुन्हा एकदा ट्रॉफीवर कब्जा केला. आता 2026 मध्ये 41 व्या वर्षी पुन्हा तोच प्रसंग उभा ठाकला असून, जर भारताने 5 मार्चला वानखेडेवर विजय मिळवला, तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊन भारत पुन्हा एकदा विश्वविजेता बनण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
जेतेपदाचं स्वप्न भंगवलं
मात्र, हा रस्ता तितकासा सोपा नाही, कारण आयसीसी टूर्नामेंट्समध्ये आतापर्यंत या दोन्ही टीम्स 5 व्या वेळी आमनेसामने येत आहेत आणि विजयाचे पारडे 2-2 असे बरोबरीत आहे. 1987 आणि 2022 च्या वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये इंग्लंडने भारताचा पराभव करून जेतेपदाचे स्वप्न भंगवले होते. त्यामुळे या 5 व्या लढतीत जो जिंकेल, तो केवळ फायनलमध्येच जाणार नाही, तर या द्वंद्वात आपली आघाडी देखील मजबूत करेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 10:33 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG 2nd Semifinal : 41 वर्षानंतर पुन्हा तोच योगायोग, टीम इंडियासाठी इंग्लंड 'लकी चार्म', तिसऱ्यांदा येणार वर्ल्ड कपची ट्रॉफी!









