मनोरंजन विश्वात खळबळ! अभिनेत्री उर्मिलाने केली हत्या; बॉयफ्रेंडसाठी लिव्ह इन पार्टनरला संपवलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Actress : अभिनेत्री लिव्ह इनमध्ये राहत असताना तिचा दुसऱ्या पुरुषावर जीव जडला. बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी तिने लिव्ह इन पार्टनरला कायमचं संपवून टाकलं आहे.
फिल्ममध्ये तुम्ही हत्येच्या स्टोरी बऱ्याच पाहिल्या आहेत. काही वेळा व्हिलनच नाही तर परिस्थितीनुसार हिरो-हिरोईनही एखाद्याची हत्या करताना दिसले आहेत. पण आता प्रत्यक्ष आयुष्यातही एका अभिनेत्रीने हत्या केल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने लिव्ह इन पार्टनरला संपवलं आहे. बॉयफ्रेंडसोबत मिळून तिने लिव्ह इन पार्टनरचा गेम केला आहे. यामुळे मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
ही अभिनेत्री आहे उर्मिला. कन्नड अभिनेत्री. जिला बिंदू म्हणूनही ओळखलं जातं. बजरंगी, पोलीस क्वार्टर्स आणि कालभैरव सारख्या कन्नड फिल्मध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत. ती लिव्ह इनमध्ये राहत होती. तिच्या लिव्ह इन पार्टनरचं नाव मोहन राव.
मीडिया रिपोर्टनुसार मोहन रावचा छोटासा फायनान्स बिझनेस होता. त्याचं लग्न झालं होतं. तो पत्नीपासून वेगळा झाला होता. यानंतर तो बिंदूसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. बिंदूही तिच्या पतीसोबत राहत नव्हती.
advertisement
बॉयफ्रेंडसोबत रचला हत्येचा कट
दोन महिन्यांपूर्वी बिंदू आणि मोहन यांनी बंगळुरूच्या मंजनाथ नगरमध्ये एक घर भाड्याने घेतलं होतं. पण त्यांनी औपचारिक भाडे करार केला नव्हता, कारण त्यांनी एका महिन्यात घर रिकामं करायचं असल्याचं सांगितलं होतं.
उर्मिला लिव्ह इनमध्ये राहत होती. पण त्याच वेळी तिचा जीव दुसऱ्या पुरुषावर जडला, ज्याचं नाव विनय. तिला त्याच्याशी लग्न करायचं होतं. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि उर्मिलाने बॉयफ्रेंडसाठी तिने लिव्ह इन पार्टनरला संपवण्याचा कट आखला.. या गुन्ह्यात तिच्या बॉयफ्रेंडनेही तिची साथ दिली.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मोहन रावची हत्या करण्याचा कट रचला होता. कटाचा एक भाग म्हणून बिंदू आणि मोहन ज्या घरात एकत्र राहत होते तिथं एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीत दारू प्यायल्यानंतर मोहनवर हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली. विनयने त्याचा मित्र धनुषच्या मदतीने मोहनवर अनेक वार केले. मोहन ओरडू लागला तेव्हा बिंदूने त्याच्या तोंडावर आणि नाकावर पट्टी बांधली आणि त्याचे हातपाय बांधले. मोहनचा मृत्यू गुदमरल्यामुळे आणि दुखापतींमुळे झाला असं वृत्त आहे.
advertisement
असा झाला हत्येचा खुलासा
पोलिसांना 12 दिवसांनी घटनेची माहिती मिळाली. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येत होती. घरमालक नटराज यांनी पोलिसांना माहिती दिली. शेजाऱ्यांनी सांगितलं की घर अनेकदा बंद असतं. 28 फेब्रुवारी रोजी तपासादरम्यान पोलिसांना मोहनचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर हत्येचा खुलासा झाला. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. पण तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Location :
Karnataka
First Published :
Mar 03, 2026 11:04 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
मनोरंजन विश्वात खळबळ! अभिनेत्री उर्मिलाने केली हत्या; बॉयफ्रेंडसाठी लिव्ह इन पार्टनरला संपवलं









