advertisement

Gold Silver Price: ६० मिनिटं अन् १.१ ट्रिलियन डॉलर्सचा चुराडा, सोनं-चांदीच्या बाजारात इतिहासातील सर्वात मोठा भूकंप

Last Updated:

Gold Silver Price: सोनं-चांदीच्या दर सोमवारी चांगलाच वधारला होता. मात्र, जागतिक कमोडिटी बाजारात असा काही 'यू-टर्न' पाहायला मिळाला, ज्याची कल्पना बड्या गुंतवणूकदारांनीही केली नव्हती.

६० मिनिटं अन्  १.१ ट्रिलियन डॉलर्सचा चुराडा, सोन्या-चांदीच्या बाजारात इतिहासातील सर्वात मोठा भूकंप
६० मिनिटं अन् १.१ ट्रिलियन डॉलर्सचा चुराडा, सोन्या-चांदीच्या बाजारात इतिहासातील सर्वात मोठा भूकंप
Gold Silver Price:  इस्रायल-अमेरिकेने इराणविरुद्ध पुकारलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेतही उलटफेर झाला आहे. कच्च तेल, नैसर्गिक वायूंच्या दरात वाढ झाली असून दुसरीकडे सोनं-चांदीदेखील महागली आहे. सोनं-चांदीच्या दर सोमवारी चांगलाच वधारला होता. मात्र, जागतिक कमोडिटी बाजारात असा काही 'यू-टर्न' पाहायला मिळाला, ज्याची कल्पना बड्या गुंतवणूकदारांनीही केली नव्हती. अवघ्या एका तासाच्या कालावधीत सोने आणि चांदीच्या बाजारमूल्यातून तब्बल १.१ ट्रिलियन डॉलर्सचा चुराडा झाला. सोन्याच्या किमतीत १०० डॉलर्सची, तर चांदीत ७ टक्क्यांची मोठी घसरण झाल्याने बाजारात एकच खळबळ उडाली.

त्या ६० मिनिटांत नेमकं काय घडलं? 

२ मार्चच्या सकाळपर्यंत सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी तेजी होती. सकाळी ८:२६ वाजता सोने ५,४२५ डॉलर्स प्रति औंस या उच्चांकी स्तरावर होते. मात्र, त्यानंतर अचानक विक्रीचा सपाटा सुरू झाला. सकाळी ११:०६ वाजेपर्यंत सोन्याचा भाव प्रति औंस ५,२९६ डॉलर्सवर कोसळला. विशेष म्हणजे, यातील १०० डॉलर्सची घसरण केवळ ६० मिनिटांत झाली. सोन्याचे मूल्य २.०५ टक्क्यांनी घसरून ७५० अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले, तर चांदी ८८ डॉलर्स प्रति औंसपर्यंत (७ टक्क्यांची घसरण) खाली आल्याने ३७० अब्ज डॉलर्सचे मूल्य पुसले गेले.
advertisement

चार्टवर दिसली रेड कँडल..

बाजार विश्लेषकांच्या मते, ही घसरण एखाद्या 'क्लासिक रिव्हर्सल'सारखी होती. चार्टवर सकाळी ९ नंतर सलग Red Candles तयार झाली. जेव्हा मोठे फंड्स एकत्रितपणे आपली पोझिशन विकतात किंवा 'मार्जिन कॉल' ट्रिगर होतात, तेव्हा अशी स्थिती निर्माण होते. 'अल्गोरिदमिक ट्रेडिंग'मुळे या विक्रीचा वेग अधिकच वाढला आणि किमती सरळ खाली आल्या.
advertisement

आज सकाळची स्थिती काय?

सोमवारी झालेल्या तीव्र घसरणीनंतर ३ मार्च रोजी सकाळी बाजाराने पुन्हा सावरण्याचे संकेत दिले आहेत. सोन्याच्या किमतीत १ टक्क्याची वाढ होऊन भाव पुन्हा ५,४०० डॉलर्स प्रति औंसवर पोहोचले आहेत. या अनपेक्षित चढ-उतारामुळे सामान्य गुंतवणूकदारांपासून ते मोठ्या संस्थांपर्यंत सर्वांचेच लक्ष आता जागतिक घडामोडींकडे लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price: ६० मिनिटं अन् १.१ ट्रिलियन डॉलर्सचा चुराडा, सोनं-चांदीच्या बाजारात इतिहासातील सर्वात मोठा भूकंप
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement