advertisement

6 दिवस आधीच कळालं हत्या होणार, एका चुकीमुळे खामेनेई संपले, US-इस्त्रायलनं सुप्रीम लीडरला कसं मारलं?

Last Updated:

शनिवारी इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. आता या हल्ल्याबाबत चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे.

News18
News18
शनिवारी इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेनं अचूक प्लॅन करून सर्वोच्च नेत्याला संपवलं. पण या हल्ल्याच्या सहा दिवस आधी म्हणजेच २२ फेब्रुवारीला खामेनेई यांना हत्येची कुणकुण लागली होती. त्यांनी तशा सूचना आपल्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. तसेच त्यांनी प्लॅन बी देखील सांगितला होता. ते स्वत: देखील खबरदारी बाळगत होते. मात्र एका चुकीमुळे त्यांचा जीव गेला आहे. याचाच फायदा अमेरिका आणि इस्त्रायलने घेतला, ते सहजपणे दोन्ही शत्रूंच्या जाळ्यात अडकले. त्यांना सावरण्याचाही वेळ मिळाला नाही.

एक चूक अन् जीवाशी मुकले खामेनेई

मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्ला अली खामेनेई हे आपल्या लष्करी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेत होते. ही बैठक सुरू असतानाच हल्ला करण्यात आला. इस्त्रायलने तेहरानमधील ट्रॅफिक कॅमेरे हॅक केले होते. शिवाय तेहरानमधील नेटवर्क सेवेत देखील बिघाड केला होता. खामेनेईंना धोक्याची कसलीच माहिती मिळू नये, याची पूर्ण काळजी इस्त्रालयने घेतली होती.
advertisement

हत्या होणार याची आधीच होती कल्पना

विशेष म्हणजे असा हल्ला होणार? इराणच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना, नेत्यांना मारलं जाईल, याची कल्पना आधीच खामेनेईंना लागली होती. यासाठी त्यांनी प्लॅन बी तयार करून आपल्या अधिकाऱ्यांना तसे आदेशही दिले होते. 22 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या NYT च्या एका अहवालानुसार, खामेनेई यांनी त्यांच्या उच्च सुरक्षा अधिकारी आणि नेतृत्वाला निर्देश दिले होते की नेत्यांच्या हत्येचा प्रयत्न होऊ शकतो, यासाठी तयार राहावे. त्यांनी प्रत्येक नेतृत्वाला त्यांच्या खालील चार स्तरांपर्यंत वारसदार (उत्तराधिकारी) नियुक्त करण्यास सांगितलं होतं.
advertisement

खामेनेईंनी कोणती चूक केली

याच पार्श्वभूमीवर इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने खामेनेई यांना त्यांचं राहण्याचं आणि कामाचं ठिकाण बदलण्याचा सल्ला दिला होता, परंतु खामेनेई यांचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा होता. ते सुरक्षा उपाय वाढवण्याऐवजी गोष्टी शक्य तितक्या सामान्य ठेवण्यावर भर देत होते. पण त्यांची हीच चूक त्यांच्यासाठी जीवघेणी ठरली. याचाच फायदा इस्त्रायल आणि अमेरिकेनं घेतला.
advertisement

हल्ल्याचा प्लॅन अचानक का बदलला?

खामेनेई यांच्यावर हल्ल्याचा प्लॅन शुक्रवारी करण्यात आला होता. मात्र यहूदी धर्मात शुक्रवार शब्बातचा दिवस असतो. म्हणजे सुट्टी घेऊन कुटुंबासोबत आराम करण्याचा आणि देवाची प्रार्थना करण्याचा दिवस. खामेनींच्या हत्येनंतर 1 मार्च रोजी प्रकाशित झालेल्या टाइम्स ऑफ इस्रायलच्या एका बातमीनुसार, 27 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी संध्याकाळी इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने सुट्टी घेतली होती.
advertisement
जर एखादी मोठी लष्करी कारवाई होणार असेल, तर अधिकारी लष्करी मुख्यालयात उपस्थित असतात. पण 27 च्या संध्याकाळी IDF चे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल इयाल जमीर आणि इतर वरिष्ठ अधिकारी शब्बातसाठी आपापल्या घरी गेले आणि कुटुंबासोबत रात्रीचे जेवण केले. असे यासाठी केले गेले जेणेकरून इराणी गुप्तहेर नेटवर्कला सर्व काही सामान्य वाटावे आणि त्यांना मोठ्या ऑपरेशनची शंका येऊ नये.
advertisement
याशिवाय, अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएने ऐनवेळी अशी माहिती दिली की हल्ल्याची वेळ रात्रीऐवजी दिवसा निश्चित करण्यात यावी, कारण दिवसा खामेनी स्वतःला जास्त सुरक्षित समजत होते. ते बेसावध असताना हल्ला करण्याचा यामागे हेतू होता. CIA ला कळले की 28 फेब्रुवारी म्हणजेच शनिवारी सकाळी तेहरानमधील याच उच्च सुरक्षा कॅम्पसमधील एका इमारतीत इराणच्या उच्च अधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही कळली की खामेनेई देखील यात सहभागी होणार आहेत. अशी संधी पुन्हा मिळणार नाही, हे हेरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ज्यात खामेनेई यांच्यासह अनेक महत्त्वाचे अधिकारी आणि कुटुंबातील सदस्यांचा यात मृत्यू झाला.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
6 दिवस आधीच कळालं हत्या होणार, एका चुकीमुळे खामेनेई संपले, US-इस्त्रायलनं सुप्रीम लीडरला कसं मारलं?
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement