advertisement

आज दिसणार वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण! सुतक काळ आणि ग्रहणाचा 'या' राशींवर होणार परिणाम, कसा असणार दिवस?

Last Updated:

होळीच्या उत्साहात यंदा खगोलशास्त्रीय घटनेची भर पडली आहे. आज वर्षातील पहिले 'खग्रास चंद्रग्रहण' लागणार असून, त्याचा प्रभाव भारतासह अनेक राशींवर पडणार आहे.

News18
News18
Chandra Grahan 2026 : होळीच्या उत्साहात यंदा खगोलशास्त्रीय घटनेची भर पडली आहे. आज वर्षातील पहिले 'खग्रास चंद्रग्रहण' लागणार असून, त्याचा प्रभाव भारतासह अनेक राशींवर पडणार आहे. विशेष म्हणजे, हे ग्रहण 'धुलिवंदन'च्या दिवशीच येत असल्याने धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
चंद्रग्रहण 2026: सुतक काळ आणि राशींवरील प्रभाव
भारतात ग्रहणाची दृश्यता
हे चंद्रग्रहण भारतात 'ग्रस्तोदय' स्वरूपात दिसणार आहे. म्हणजेच, जेव्हा चंद्र उगवेल तेव्हा त्याला आधीच ग्रहण लागलेले असेल. पूर्व भारतात हे ग्रहण अधिक स्पष्ट दिसेल, तर उर्वरित महाराष्ट्रात ते केवळ 15 ते 30 मिनिटांसाठी खंडग्रास स्वरूपात पाहता येईल.
ग्रहणाची वेळ
ग्रहणाची सुरुवात दुपारी 3:20 वाजता होईल. खग्रास अवस्था म्हणजेच जेव्हा चंद्र लाल दिसेल. हे दुपारी 4:34 ते 5:33 पर्यंत असेल. भारतात चंद्रोदयाच्या वेळी संध्याकाळी 6:15 ते 6:45 च्या दरम्यान हे ग्रहण दिसण्यास सुरुवात होईल आणि सायंकाळी 6:48 वाजता ग्रहण समाप्त होईल.
advertisement
सुतक काळ
चंद्रग्रहणाचा सुतक काळ ग्रहणाच्या 9 तास आधी सुरू होतो. उद्या, 3 मार्च रोजी सकाळी 6:20 वाजल्यापासून सुतक काळ लागू होईल. सुतक काळात मंदिरे बंद राहतात आणि कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा अर्चा केली जात नाही. ग्रहण संपल्यानंतर म्हणजेच 6:48 नंतर शुद्धीकरण करून दानधर्म करणे शुभ मानले जाते.
सिंह राशीत ग्रहण: हे ग्रहण सिंह राशी आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात लागत आहे. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तींनी उद्याचा दिवस अत्यंत सावधगिरीने घालवणे आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा.
advertisement
'या' राशींवर होणार नकारात्मक प्रभाव
ज्योतिषांच्या मते, हे ग्रहण मेष, कन्या आणि मीन राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक ठरू शकते.
मेष: जोडीदाराशी वाद किंवा नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. आजच्या ग्रहणाचा प्रभाव मेष राशीवर दिसून येईल त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. यामुळे आज जोडीदारासह वादविवाद टाळण्याचा सल्ला दिला जात आहे.
कन्या: आर्थिक नुकसान आणि मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. आजचे चंद्रग्रहण कन्या राशीसाठी आव्हानात्मक असू शकते. आज कन्या राशीच्या जातकांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
advertisement
मीन: आरोग्याच्या तक्रारी आणि कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या जातकांना आज त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.
ग्रहणाचे उपाय
नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी ग्रहणाच्या काळात 'ओम नमः शिवाय' किंवा 'महामृत्युंजय मंत्राचा' जप करावा. सुतक काळ सुरू होण्यापूर्वी खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकून ठेवावीत. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून गरजू व्यक्तींना पांढऱ्या वस्तूंचे दान करणे फलदायी ठरते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
आज दिसणार वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण! सुतक काळ आणि ग्रहणाचा 'या' राशींवर होणार परिणाम, कसा असणार दिवस?
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement