advertisement

Fish Fry Recipe : अगदी सोप्या पद्धतीने बनवा क्रिस्पी फिश फ्राय! अजिबात फसणार नाही तुमचा प्रयत्न, पाहा रेसिपी

Last Updated:
How To Make Prefect Fry Fish At Home : फिश आवडणाऱ्या लोकांपैकी बहुतांश लोकांना भाजीपेक्षा फ्रिश फ्राय खायला जास्त आवडतं. त्यामुळे हॉटेलमध्ये गेल्यानंतर बरेच आधी फ्रिश फ्रायच ऑर्डर करतात. मात्र घरी हे फ्रिश फ्राय बनवताना बऱ्याचदा आपले रेसिपी फसते. आज आम्ही तुम्हाला यासाठी काही खास टिप्स देणार आहोत.
1/7
फिश फ्राय बनवणं तसं फार अवघड नसतं. मात्र काहीवेळा आपले माप चुकते किंवा एखादी स्टेप मिस होते. त्यामुळे रेसिपी फास्ट. काही लोक पहिल्यांदाच फिश फ्राय बनवत असतात, त्यांचीही फिश बनवताना तुटते किंवा व्यवस्थित फ्राय होत नाही. या सर्व प्रोब्लेमवर आज आम्ही काही सोप्या टिप्स तुम्हाला देत आहोत. चला पाहूया.

2/7
परफेक्ट फिश फ्राय बनवण्यासाठी माशांचे तुकडे प्रथम पूर्णपणे धुऊन व्यवस्थित कोरडे करा. नंतर एका भांड्यात हळद, लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, मीठ, आले-लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस मिसळून मसाला तयार करा.

3/7
हा बनवलेला मसाला माशांच्या तुकड्यांवर व्यवस्थित लावा. हे मॅरिनेशन किमान २० ते ३० मिनिटे ठेवा. चांगल्याप्रकारे मॅरीनेट झाल्यास मसाल्यांची चव फिशच्या आतपर्यंत उतरते. फिश चांगली शिजते आणि फ्राय केल्यानंतर मस्त क्रिस्पी होते.

4/7
आता हे मॅरीनेट केलेले फिशचे तुकडे घ्या आणि त्यावर बेसन किंवा तांदळाचे पीठ आपल्याला कोट करायचे आहे. तुम्ही बेसन किंवा तांदळाच्या पिठामध्ये तिखट मीठही टाकू शकता. याने फिश कुरकुरीत होते, तिला मस्त सोनेरी रंग आणि भन्नाट चव येते.

5/7
नांतर एका पॅनमध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी मोहरीचे तेल गरम करा. तेलातून धूर आला की, माशांचे तुकडे तेलामध्ये टाका. मासे मध्यम ते कमी आचेवर हळूहळू तळा. दोन्ही बाजूंना एकसारखे सोनेरी आणि कुरकुरीत होऊ द्या, यासाठी अधूनमधून ते पलटत राहा. कमी आचेवर तळल्याने मासे व्यवस्थित शिजतात आणि जळत नाहीत.

6/7
तयार फिश फ्राय तुम्ही प्लेटमध्ये चिरलेला कांदा, कोथिंबीर घालून सर्व्ह करू शकता. त्याचप्रमाणे वरून लिंबाचा रस टाकल्यास या माशांची चव आणखी वाढते. माशांसोबत हिरवी चटणी सर्व करा.

7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement