advertisement

धुळवडीच्या आधीच रक्ताची होळी, लातूरमध्ये शेजाऱ्याने आईसह दोन मुलांना भोसकलं

Last Updated:

लातूरच्या भांबरी चौकात चंद्रकांत कांबळेने बालाजी सोमवंशी कुटुंबावर चाकूने हल्ला केला. आईसह दोन मुले जखमी. पोलिसांनी कांबळेला अटक केली. परिसरात खळबळ.

Ai Generated Photo
Ai Generated Photo
लातूर शहरातील भांबरी चौक परिसरात एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. घरासमोर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या शेजाऱ्याला जाब विचारला म्हणून त्याने एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आईसह दोन मुले गंभीर जखमी झाली असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

नेमकं काय घडलं?

महादेव-पार्वतीनगर भागात राहणारे बालाजी सोमवंशी यांनी शेजारी राहणाऱ्या चंद्रकांत कांबळे (रा. जेवळी) याला हटकले होते. कांबळे हा सोमवंशी यांच्या घरासमोर दारू पिऊन आरडाओरड आणि शिवीगाळ करत होता. "आमच्या दारात गोंधळ का घालता? इथे महिला राहतात," असं बालाजी यांनी विचारलं. याचा राग आल्याने संशयित कांबळे याने "तू मला विचारणारा कोण?" असे म्हणत थेट बालाजीच्या पोटात चाकू खुपसला.
advertisement

बचावासाठी धावलेल्या भावावर आणि आईवरही वार

हल्ल्याचा हा प्रकार पाहून बालाजीचा भाऊ नागेश सोमवंशी भांडण सोडवण्यासाठी धावला. मात्र, संतापलेल्या कांबळेने त्याच्याही पोटात चाकू मारला. आपल्या दोन्ही मुलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून आई चंद्रकला सोमवंशी मुलांच्या बचावासाठी धावल्या. निर्दयी संशयिताने दया माया न दाखवता त्यांच्याही पोटावर चाकूने गंभीर वार केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
या हल्ल्यानंतर संशयित चंद्रकांत कांबळे घटनास्थळावरून पसार झाला होता. पण गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. या प्रकरणी लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या या खुनी हल्ल्यामुळे लातूर शहरात खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धुळवडीच्या आधीच रक्ताची होळी, लातूरमध्ये शेजाऱ्याने आईसह दोन मुलांना भोसकलं
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement