advertisement

जुना लॅपटॉपला नवे करतील हे स्वस्त गॅजेट! मिळेल जबरदस्त परफॉर्मेंस 

Last Updated:

काही वर्षे वापरानंतर लॅपटॉपचा परफॉर्मेंस नव्यासारखा राहत नाही. अशा परिस्थितीत काही स्वस्त गॅझेटचा वापर तुम्हाला लॅपटॉप नवाकोरा असण्याचा अनुभव देईल. 

लॅपटॉप
लॅपटॉप
मुंबई : जास्तीत जास्त लॅपटॉप हे 3-4 वर्षे चालल्यानंतर जुने होतात. तर काहींचा परफॉर्मेंस 5-7 वर्षात खराब होतो. खरंतर याचा अर्थ असा नसतो की, तुम्हाला लॅपटॉप बदलावा लागेल. अशा परिस्थितीत तुम्ही स्वस्त किंमतीच्या काही गॅझेटच्या मदतीने आपला जुना लॅपटॉप एकदम नव्यासारखा बनवू शकतो. यामुळे तुम्हाला लॅपटॉप बदलण्याची गरजही पडणार नाही आणि परफॉर्मेंस एकदम जबरदस्त मिळेल. चला जाणून घेऊया जुन्या लॅपटॉपने नवीनसारखा परफॉर्मेंससाठी कोणत्या गॅझेटची गरज पडेल.
कूलिंग पॅड 
जुन्या लॅपटॉप्समध्ये ओव्हरहिटिंगची समस्या येणे सामान्य गोष्ट आहे. हेवी टास्क आणि अनेकदा बेसिक टास्कच्या दरम्यानही लॅपटॉप गरम होतात. ज्यामुळे पूर्ण सिस्टम स्लो होते. एयरफ्लो वेंट्स बंद होणे आणि कंप्यूटर फॅन काम करत नसल्याने अशी परिस्थिती येते. यापासून बचावासाठी तुम्ही कूलिंग पॅडचा वापर करु शकता. कूलिंग पॅड तुमच्या लॅपटॉपला गरम होण्यापासून वाचवेल.
advertisement
एक्सटर्नल माउस आणि कीबोर्ड 
जास्त वेळपर्यंत लॅपटॉप वापरल्याने कीबोर्ड खराब होण्याचे चान्सेस असतात. अनेक कीज काम करणे बंद करतात आणि ट्रॅकपॅडही खराब होते. अशावेळी कीबोर्ड रिप्लेस करणे एक महागडा ऑप्शन ठरु शकतो. याजागी तुम्ही एक्सटर्नल कीबोर्ड आणि माउस यूज करुन प्रॉब्लम दूर करु शकता. अशा परिस्थितीत, तुम्ही कीबोर्ड न बदलता ही समस्या स्वस्तात सोडवू शकता.
advertisement
USB हब
8-10 वर्षे जुन्या लॅपटॉपमध्ये जास्त USB पोर्ट नसायचे. जर एखाद्यामध्ये पोर्ट्स मिळाले तर ते लेटेस्ट स्टँडर्डला सपोर्ट करत नाही. याच कारणामुळे एकाच पोर्टमध्ये वारंवार डिव्हायसेस प्लग-इन आणि प्लग-आउट करावं लागत होतं. तुम्हीही अशाच समस्येचा सामना करत असाल तर यूएसबी हब एक सोपा उपाय असू शकतो. USB हबमध्ये तुम्ही एकाचवेळी अनेक डिव्हायसेसने प्लग-इन करु शकाल.
advertisement
एक्सटर्नल स्टोरेज
जुन्या लॅपटॉपमध्ये स्टोरेज कमी येत होते. ज्यामुळे ते लवकर फूल होत होते. स्टोरे फूल झाल्याने हे लॅपटॉपच्या स्पीडवरही परिणाम करते. तुम्हीही स्टोरेजच्या कमतरतेचा सामना करत असाल तर एक्सटर्नसल स्टोरेज तुमचं काम सोपं करेल. बाह्य स्टोरेजसाठी तुम्हाला दोन पर्याय सापडतील: HDD आणि SSD. HDD अधिक परवडणारे आहेत, ज्यामुळे तुम्हाला वैयक्तिक फाइल्स आणि गेम्स साठवता येतात, तर SSD अधिक महाग असतात परंतु अधिक विश्वासार्ह आणि वेगवान असतात.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
जुना लॅपटॉपला नवे करतील हे स्वस्त गॅजेट! मिळेल जबरदस्त परफॉर्मेंस 
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement