अभिनेत्री उर्मिलानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकही कायद्याच्या कचाट्यात! लैंगिक छळाचा गुन्हा दाखल
- Published by:Priya Lad
Last Updated:
Harassment Case Against Director :एका प्रसिद्ध फिल्मचा हा दिग्दर्शक ज्याच्यावर फिल्म इंडस्ट्रीतीलच एका महिलेने लैंगिक छळ केल्याचा आरोप लावला आहे.
कन्नड अभिनेत्री उर्मिला उर्फ बिंदूविरोधात हत्या प्रकरणात अटक केल्यानंतर आता एक प्रसिद्ध दिग्दर्शकही कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. एका प्रसिद्ध फिल्मचा हा दिग्दर्शक ज्याच्यावर फिल्म इंडस्ट्रीतीलच एका महिलेने लैंगिक छळ केल्याचा आरोप लावला आहे. त्याच्याविरोधात तिने पोलिसात धाव घेतली.
लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेला हा दिग्दर्शक आहे चिदंबरम एस पोडुवाल. मंजुम्मेल बॉईज या प्रसिद्ध मल्याळम फिल्मचा दिग्दर्शक. ज्यांनी लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि हळूहळू त्यांच्या विशिष्ट सिनेमॅटिक शैलीने स्वतःला स्थापित केलं.
advertisement
जान-ए-मन सारख्या चित्रपटांनी त्यांना इंडस्ट्रीमध्ये ओळख मिळवून दिली. पण 'मंजुम्मेल बॉईज'च्या प्रचंड यशाने त्यांना मुख्य प्रवाहात स्थापित केलं. एक तरुण दिग्दर्शक म्हणून त्यांच्या आशय-केंद्रीत आणि वास्तववादी सिनेमासाठी त्यांचं कौतुक झालं. मंजुम्मेल बॉईजच्या यशानंतर चिदंबरम यांना मल्याळम चित्रपटसृष्टीतील उदयोन्मुख दिग्दर्शकांपैकी एक मानलं जात होतं. त्यांच्यावरील आरोपांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
advertisement
चिदंबरम यांच्याविरोधात नेमकी तक्रार काय?
केरळमधील एर्नाकुलम टाउन साउथ पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट उद्योगाशी संबंधित एका महिलेच्या तक्रारीवरून रविवारी (2 मार्च 2026) हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितल्यानुसार तक्रारदार महिलेने आरोप केला आहे की, दिग्दर्शकाने 2022 मध्ये कोची शहरातील एका अपार्टमेंटमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
advertisement
तक्रारीनुसार चिदंबरम यांच्याविरुद्ध लैंगिक छळ आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. आयपीसीच्या कलम 74 आणि 75 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे आणि प्रकरणाशी संबंधित सर्व तथ्ये सखोलपणे तपासली जातील.
या प्रकरणी दिग्दर्शकाकडून अद्याप कोणतंही अधिकृत विधान आलेलं नाही. गरज पडल्यास दिग्दर्शकाची चौकशी केली जाईल. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला जाईल., असं पोलिसांनी सांगितलं. पण या बातमीमुळे फिल्म इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे.
advertisement
जेव्हा चित्रपट उद्योगात, विशेषतः साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीत कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेबद्दल आणि लैंगिक छळाबद्दल गंभीर वादविवाद सुरू आहेत, अशा वेळी हे प्रकरण समोर आलं आहे. गेल्या काही वर्षांत असंख्य कलाकार आणि तंत्रज्ञ त्यांचे अनुभव शेअर करण्यासाठी पुढे आले आहेत, ज्यामुळे उद्योगात जबाबदारीची मागणी वाढली आहे.
Location :
Kerala
First Published :
Mar 03, 2026 12:09 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
अभिनेत्री उर्मिलानंतर प्रसिद्ध दिग्दर्शकही कायद्याच्या कचाट्यात! लैंगिक छळाचा गुन्हा दाखल







