IND vs ENG : संजू सॅमसनची एक चूक अन् ICC करणार कारवाई! सेमीफायनलला 'नो एन्ट्री', नियम काय सांगतो?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
ICC ban Sanju Samson before semifinal : मॅच संपल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करताना संजूने भावनेच्या भरात आपलं हेल्मेट फेकलं होतं. त्यामुळे संजूवर कारवाईची शक्यता आहे.
IND vs ENG T20 World Cup Semi Final : आयसीसी टी-20 वर्ल्ड कपच्या अत्यंत महत्त्वाच्या सुपर 8 मॅचमध्ये टीम इंडियाचा स्टार ओपनर संजू सॅमसन याने कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर 50 बॉलमध्ये नाबाद 97 रन्सची खेळी करत भारताला सेमीफायनलचे तिकीट मिळवून दिलं. या मॅचमध्ये भारताने वेस्ट इंडिजचा पराभव केला असून संजूला त्याच्या या मॅचविनिंग खेळीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं. आता 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये संजू खेळणार की नाही? यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्याला कारण संजू सॅमसनची एक चूक!
भावनेच्या भरात हेल्मेट फेकलं
सेमीफायनलपूर्वी संजू सॅमसन एका मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली असून आयसीसी त्याच्यावर कारवाई करू शकते. मॅच संपल्यानंतर विजयाचा आनंद साजरा करताना संजूने भावनेच्या भरात आपलं हेल्मेट फेकलं होतं आणि दोन्ही हात आकाशाकडे उंचावून देवाचे आभार मानले होते. हे सेलिब्रेशन आयसीसीच्या आचारसंहितेचा भंग मानलं जाऊ शकतं, ज्यामुळे त्याच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची चिन्हे आहेत.
advertisement
advertisement
लेव्हल 1 चा गुन्हा
आयसीसीच्या नियमांनुसार, क्रिकेटमधील साहित्याचा किंवा कपड्यांचा गैरवापर करणे हा गैरवर्तनाचा प्रकार मानला जातो, जो लेव्हल 1 चा गुन्हा ठरू शकतो. हेल्मेट हवेत फेकणं हे चुकीचं, निष्काळजीपणाचं किंवा धोकादायक वर्तन म्हणून मानलं जातं. जरी हे कृत्य आनंदाच्या भरात केलं असलं, तरी मॅच रेफरीच्या निर्णयावर संजूला शिक्षा होणार की नाही हे अवलंबून असेल, ज्यामुळे भारतीय गोटात चिंतेचं वातावरण आहे.
advertisement
मॅच फीमधील 50 टक्क्यांपर्यंत कपात
दरम्यान, लेव्हल 1 च्या या गुन्ह्यासाठी आयसीसी मॅच रेफरी खेळाडूला अधिकृत ताकीद देऊ शकतो किंवा त्याच्या मॅच फीमधील 50 टक्क्यांपर्यंत कपात केली जाऊ शकते. याशिवाय संजूच्या खात्यात 1 किंवा 2 डिमेरिट पॉईंट्स देखील जोडले जाऊ शकतात. 5 मार्चच्या मोठ्या लढतीपूर्वी अशा प्रकारची कारवाई झाल्यास त्याचा परिणाम टीम इंडियावर होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 12:03 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : संजू सॅमसनची एक चूक अन् ICC करणार कारवाई! सेमीफायनलला 'नो एन्ट्री', नियम काय सांगतो?










