मोटोरोलाचा डबल धमाका! बुक-स्टाइल फोल्डेबल फोन लॉन्च, पाहा फीचर्स
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
मोटोरोला रेजर फोल्ड आणि मोटोरोला एज 70फ्यूजन MWC 2026 मध्ये लॉन्च झाले आहेत. रेजर फोल्डमध्ये 8.1 इंच फोल्डेबल डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8 जेन 5, 6000mAh बॅटरी आणि 8K व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळते. जाणून घेऊया किंमत, फीचर्स आणि उपलब्धतेची संपूर्ण माहिती...
मुंबई : मोटोरोलाने MWC 2026 दरम्यान आपले दोन नवीन स्मार्टफोन मोटोरोला रेजर फोल्ड आणि मोटोरोला एज 70 फ्यूजन लॉन्च केले आहेत. रेजर फोल्ड कंपनीचा पहिला बुक-स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन आहे. जो प्रीमियम फीचर्स आणि दमदार बॅटरीसह येतो. तसंच एज 70 फ्यूजन मिड-प्रिमियम सेगमेंटला टार्गेट करतो.
Motorola Razr Fold: फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
मोटोरोला रेझर फोल्डमध्ये 8.1-इंचाचा 2K LTPO pOLED इनर डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राइटनेस 6,200 निट्स आहे. 6.6-इंचाचा कव्हर डिस्प्ले 165Hz रिफ्रेश रेट आणि 6,000 निट्स ब्राइटनेससह येतो.
फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 चिपसेटवर चालतो. सोबतच एड्रीनो A829 GPU, 16GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज देण्यात आला आहे.
advertisement
कॅमेरा सेटअपविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये 50 मेगापिक्सेल सोनी LYTIA मेन सेन्सर, 50 मेगापिक्सल पेरिस्कोप टेलीफोटो (3x ऑप्टिकल झूम) आणि 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेराचा समावेश आहे.
हे 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करते. या डिव्हाइसला 6,000mAh बॅटरी आहे जी 80W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. उघडल्यावर त्याची जाडी 4.7mm आणि बंद केल्यावर अंदाजे 10mm आहे. युरोपमध्ये त्याची किंमत EUR 1,999 (अंदाजे ₹2.14 लाख) आहे....
advertisement
मोटोरोला एज 70 Fusion: दमदार मिड-रेंज ऑप्शन
मोटोरोला एज 70 फ्यूजनमध्ये 6.8 इंचाचा 1.5K अमोलेड डिस्ल्पेले आहे. ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 5,200 निट्स पीक ब्राइटनेस मिळतो. हे स्नॅपड्रॅगन 7s जेन 3 प्रोसेसरवर काम करते.
advertisement
या फोनमध्ये 50MPल सोनी LYTIA 710 सेन्सर (OISसह), 13MP अल्ट्रावाइड लेन्स आणि मॅक्रो लेन्स आहे. समोर 32MP सेल्फी कॅमेरा आहे. यात 5,200mAh बॅटरी आहे जी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. मोटोरोला रेझर फोल्ड आणि एज 70 फ्यूजन हे दोन्ही फोन येत्या काही महिन्यांत युरोप, आशिया पॅसिफिक आणि इतर निवडक बाजारपेठांमध्ये उपलब्ध असतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 02, 2026 4:57 PM IST








