advertisement

Iran Strike On Israel US: इराणचा मोठा पलटवार! खामेनींच्या मृत्यूनंतरही अमेरिका-इस्रायलला दणका, आखाती देशांत काय-काय झालं?

Last Updated:

Iran Counter Attack On US Isarel : इस्रायल-अमेरिकेने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाच्या चौथ्या दिवशीदेखील हवाई हल्ले सुरू आहेत. दोन्ही बाजूने हल्ले सुरू असून इराणनेदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

इराणच्या हल्ल्यात तेल अविवमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करताना इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष
इराणच्या हल्ल्यात तेल अविवमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करताना इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष
Iran Strike On Israel US: इस्रायल-अमेरिकेने इराणविरुद्ध सुरू केलेल्या युद्धाच्या चौथ्या दिवशीदेखील हवाई हल्ले सुरू आहेत. दोन्ही बाजूने हल्ले सुरू असून इराणनेदेखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सर्वोच्च नेते अय्यातुला खामेनेी यांच्या मृत्यूनंतरही इराणकडून इस्रायल अमेरिकेवर पलटवार सुरू आहे.

अमेरिकन दूतावास ते लष्करी तळ...इराण आक्रमक

आखाती देशांमधील तणाव आता टोकाच्या वळणावर पोहोचला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा खळबळजनक दावा केला आहे. दुसरीकडे, लेबनॉनमधील सशस्त्र गट हिजबुल्लाने उत्तर इस्रायलमधील एका महत्त्वाच्या हवाई तळावर ड्रोन हल्ला केल्याचे जाहीर केल्याने संपूर्ण पश्चिम आशियात युद्धाचा भडका उडाला आहे.
advertisement
सौदी अरेबियाची राजधानी रियादमधील अमेरिकन दूतावासावरही इराणने ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केला. ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकन दूतावासात आगीचे लोळ, धूर दिसून आला. या ठिकाणी जीवितहानीचे कोणतेही वृत्त समोर आले नाही. या हल्ल्यानंतर दूतावासातील व्हिसा आणि इतर सर्व प्रकारचे कामकाज अमेरिकेने थांबवले आहे.
अमेरिकेने जॉर्डनमधील आपले दूतावास रिकामं केले असल्याचे समोर आले आहे. इराणने कुवैतमधील लष्करी तळावर वारंवार हल्ले केल्यानंतर आता अमेरिकेने आपला कुवैतमधील दूतावासही बंद केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement

बहरीनमधील अमेरिकन एअरबेसवर क्षेपणास्त्र मारा

इराणच्या 'आयआरजीसी'ने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे बहरीनच्या 'शेख इसा' (Sheikh Isa) भागात असलेल्या अमेरिकन एअरबेसवर भीषण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २० ड्रोन आणि ३ लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. या "मॅसिव्ह अटॅक"मध्ये अमेरिकन हवाई तळाची मुख्य कमांड बिल्डिंग आणि मुख्यालय उद्ध्वस्त झाल्याचा दावा इराणने केला आहे. तसेच तळावरील इंधन टाक्यांना मोठी आग लागल्याचे वृत्त आहे. या हल्ल्याबाबत अद्याप बहरीन किंवा अमेरिकेकडून अधिकृत भाष्य आलेले नाही.
advertisement
तर, इराकमधील एअरबिलमधील अमेरिकेच्या तळावरही इराणने हल्ला केला असल्याचे वृत्त समोर आले आहे.

हिजबुल्लाचा इस्रायलला प्रत्युत्तर

लेबनॉनमध्ये इस्रायलने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यांचा सूड घेण्यासाठी हिजबुल्लाने उत्तर इस्रायलमधील 'राममत डेव्हिड' (Ramat David) एअरबेसवर हल्ला चढवला. हिजबुल्लाने केलेल्या दाव्यानुसार, त्यांनी ड्रोन पाठवून या तळावरील रडार यंत्रणा आणि कंट्रोल रूमला लक्ष्य केले आहे. उत्तर इस्रायलमधील या कारवाईमुळे इस्रायलची हवाई सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून सीमाभागात तणाव अधिकच वाढला आहे.
advertisement

जागतिक बाजारपेठेवर युद्धाचे सावट

इराण आणि हिजबुल्लाच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अमेरिकेसह पाश्चात्य देश चिंतेत आहेत. अमेरिकन मालमत्तेवर थेट हल्ले झाल्यामुळे आता अमेरिका याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. या संघर्षाचा थेट परिणाम जागतिक तेल पुरवठ्यावर आणि पर्यायाने कच्च्या तेलाच्या किमतींवर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement

आम्ही अधिक दिवस लढण्यास तयार, ट्रम्प यांचे भाष्य...

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे की अमेरिकेकडे शस्त्रे आणि दारूगोळ्याचा मोठा साठा आहे. आम्ही दीर्घकाळ लढू शकतो. गरज पडल्यास अमेरिका आपले लष्करही इराणमध्ये उतरवण्यास सज्ज असल्याचेही वक्तव्य त्यांनी केले होते. दरम्यान, अमेरिकन नागरिकांनी शक्य तितक्या लवकर मध्य पूर्व सोडण्याचे आवाहन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
Iran Strike On Israel US: इराणचा मोठा पलटवार! खामेनींच्या मृत्यूनंतरही अमेरिका-इस्रायलला दणका, आखाती देशांत काय-काय झालं?
Next Article
advertisement
IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement