advertisement

होळीला काळाचा घाला! बसची इकोला भीषण धडक, 6 जणांचा जागीच मृत्यू

Last Updated:
यमुना एक्सप्रेस वेवर हाथरसजवळ डबल डेकर बसने इको कारला धडक दिल्याने ६ जणांचा मृत्यू, अनेक जखमी. चिरंजीवनाथ सिन्हा यांनी बस चालकाचा निष्काळजीपणा सांगितला.
1/6
रिकामा रस्ता आणि सुस्साट गाडी पहाटेची शांतता, नुकतीच डोळ्यावर झोप होती आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. भरधाव वेगाने येणाऱ्या डबल डेकर बसने क्षणात चक्काचूर केला. बसने इको कारला भीषण धडक दिली.

2/6
या अपघातामध्ये जागीच ६ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच जणांचा ओळख पटवण्यात यश आलं आहे. धडक इतकी जोरात होती की ईको कारचा अक्षरशः चुराडा झाला. कारमध्ये एकूण १६ जण होते. त्यापैकी ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

3/6
यमुना एक्सप्रेस वेवर झालेल्या या भीषम अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. मृतदेहांची अवस्था इतकी भयाण होती की, त्यापैकी केवळ ५ जणांचीच ओळख पटू शकली आहे, तर एका मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम अजूनही सुरू आहे.

4/6
जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलिस अधीक्षक चिरंजीवनाथ सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात नसून बस चालकाचा निष्काळजीपणा होता. समोरच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात आणि वेगाच्या धुंदीत बस चालकाने कारला चिरडले.

5/6
पोलिसांनी तातडीने बस चालक, क्लिनर आणि कंडक्टरला अटक केली असली, तरी ज्यांच्या घराचा आधार या अपघातात गेला, त्या कुटुंबांचं दुःख न भरून येणारे आहे. जखमींना तातडीने आग्रा येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून, तिथे ते मृत्यूशी झुंज देत आहेत.

6/6
ही हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील यमुना एक्सप्रेस-वेवर घडली. सादाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगला हरियाजवळ माईलस्टोन १४१ वर शनिवारी पहाटे ४:२० च्या सुमारास हा थरार घडला.

IND vs WI : 'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
'संजू मला तुझी गरज आहे', डगआऊटमधून कुणी मेसेज दिला,मॅचचा टर्निंग पॉईंट ठरला!
  • संजूला डगआऊटमधून कुणी मेसेज दिला

  • संजूने एकहाती मॅच फिरवली

  • टीम इंडियाला सेमी फायनलला पोहोचवलं

View All
advertisement