Shani Asta 2026: आलीच ती वेळ! 13 मार्चला शनिदेव पुन्हा होणार अस्त; या राशींची साडेसाती सुटल्यात जमा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Asta 2026: ज्योतिषशास्त्रात शनीला कर्माचं फळ देणारा ग्रह मानलं जातं. हा ग्रह सगळ्यात संथ गतीने चालणारा असल्यामुळे एका राशीत जवळपास अडीच वर्षं राहतो, म्हणूनच याचा परिणाम बराच काळ टिकून राहतो. सध्या शनी मीन राशीत आहे आणि 2 जून 2027 पर्यंत तिथेच राहणार आहे. या काळात शनी कधी वक्री होईल, कधी मार्गी, तर कधी अस्त-उदय अवस्थेत असेल.
द्रिक पंचांगानुसार, 13 मार्च 2026 रोजी शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजून 13 मिनिटांनी शनी मीन राशीत अस्त होईल. त्यानंतर सुमारे 40 दिवस अस्त अवस्थेत राहून 22 एप्रिल 2026 रोजी बुधवारी पहाटे 4 वाजून 49 मिनिटांनी शनीचा पुन्हा उदय होईल. असं मानलं जातं की जेव्हा शनी अस्त होतो, तेव्हा त्याचे कडक किंवा कठीण परिणाम काही प्रमाणात कमी होतात. त्यामुळे काही राशींना या काळात मोठा दिलासा आणि फायदा मिळण्याचे योग आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
कुंभ - कुंभ राशीसाठी शनीचा अस्त होणं संमिश्र फळ देणारं असलं, तरी एकूण फायद्याचेच संकेत आहेत. शनी तुमच्या 2 व्या घरात अस्त होईल आणि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या काळात कमाईचे नवीन रस्ते उघडतील आणि तुमच्या कष्टाचं चीज होईल. नोकरीत तुमच्या कामाचं कौतुक होईल. मालमत्तेच्या कामात फायदा मिळू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची बोलण्याची पद्धत थोडी कडक होऊ शकते, ज्यामुळे नात्यात तणाव येईल. त्यामुळे विचार करून बोला आणि खर्चावर ताबा ठेवा.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








