नियम धाब्यावर बसवले का? लिलावतीमध्ये सिटिस्कॅनसाठी नकार, अखेर सोडावा लागला शो; 8 वर्षांनी अभिनेत्याचा बिग बॉसला सवाल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
सुशांत शेलारने बिग बॉस मराठी 6 वर प्रतिक्रिया देत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांत शेलारला बिग बॉस मराठी सीझन 1 प्रकृतीच्या कारणामुळे सोडावा लागला होता.
advertisement
advertisement
राजश्री मराठीशी बोलताना सुशांत शेलार म्हणाला, "मी बिग बॉसच्या घरात जाऊन आलोय, त्यामुळे इतर स्पर्धक कसे आहेत कसे खेळत आहेत हे जाणून घेण्यासाठी थोडा वेळ का होईना, शो पाहतो. पहिला सिझन कसा होता आणि तो किती लोकप्रिय झाला हे महाराष्ट्राला माहित आहे. माझ्या नंतरचे सिझन कसे होते आणि त्याचे रेटिंग काय आहेत हे मी बोलण्याची गरज नाही."
advertisement
सुशांत पुढे म्हणाला, "मला शोमध्ये नियम दाखवले. सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळाव्या लागतात. तुला लिलावतीला जाऊन सिटी स्कॅन करता येणार नाही. तुला लोणावळा सिटी सोडता येणार नाही, असे नियम दाखवून मला तो शो सोडावा लागला. त्याच्यानंतर इतर सिझन्समध्ये बरीच लोकं जात होते, येत होते. मग तेव्हा का नियम धाब्यावर बसवले?"
advertisement
advertisement
advertisement







