Success story Sangram Malkar: 35 टक्के मिळाले, गावाकडून आला म्हणून लोक हसायचे आज PSI अधिकारी, वेटर ते PSI प्रवास
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
संग्राम मळकर यांनी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेतलं, वेटर म्हणून काम केलं, आणि PSI परीक्षेत यश मिळवून पोलीस अधिकारी बनले. त्यांच्या संघर्षाने ग्रामीण तरुणांचा सन्मान वाढवला.
शिक्षणाची गोडी नाही, पण तरीही दहावीपर्यंत 60 टक्के मिळवले, पुढे घरच्यांच्या हट्टामुळे सायन्स घेतलं आणि 35 टक्केच मिळाले. सगळे हसायल लागले. मात्र त्याला आर्ट्सला जायचं होतं. पण कुणीही ऐकलं नाही. कशीबशी बारावीची परीक्षा पार पडली. हातात मार्क नाहीत, 47 टक्क्यांना कोण विचारणार? कॉलेजमध्ये डोनेशन भरायला पैसे नव्हते. परिस्थिती गरिबीची होती. मग हॉटेल मॅनेजमेंटकडे पुढे अॅडमिशन घेतली.
हॉटेल मॅनेजमेंट हळूहळू आवडायला लागलं. पुढे सिंगापूरला जाऊन तिथे सगळं शिकून घ्यायचं आणि मग काहीतरी पुढे सुरू करायचं हे डोक्यात ठरलं. मात्र नियतीनं आणि नशीबानं साथ दिली नाही. त्याच दरम्यान 2010 रोजी वडिलांचं छत्र हरपलं. घरात दोघं भाऊ आणि आई. आता करायचं कसं. मनातली सगळी स्वप्न बाजूला ठेवली. ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यानंतर पुन्हा गावाकडे आईसोबत राहायला आला. त्याच दरम्यान त्याच्या भावाचं पोलीस दलात सिलेक्शन झालं.
advertisement
दोन वर्ष शेतीमध्ये घालवली. लोक हसत होते, उलट सुलट बोलत होते. मात्र आईनं सांभाळून जपलं, सांभाळून घेतलं. मोठ्या भावानं पुढची दिशा दिली. पोलीस दलात भरतीसाठी प्रयत्न कर असा सल्ला दिला. त्याच्या सल्ल्यानं मला पुण्यात यावं लागलं. जेमतेम कपडे घेऊन पुण्यात पोहोचलो. मात्र तिथली परिस्थिती पाहता हे काय आपल्याला जमणार नाही हे मनात निश्चित होतं. मात्र तिथल्या MPSC साठी गाइड करणाऱ्या शिक्षकांना माझ्यावर विश्वास होता. त्यांनी पाहताच क्षणी सांगितलं PSI ची तयारी सुरू कर.
advertisement
संग्राम मळकर यांचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल असा आहे. घरची परिस्थिती बेताची, वडील शेतकरी. घरच्यांना हातभार लावण्यासाठी त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आणि पुण्यात नोकरी सुरू केली. पण ही नोकरी एसी केबिनमधली नव्हती, तर एका नामांकित हॉटेलमध्ये वेटर म्हणून होती.
ग्राहकांना ऑर्डर्स देणं, उष्टी भांडी उचलणं आणि दिवसाचे १२-१२ तास सलग उभं राहून सेवा देणं ही त्यांची ड्युटी होती. पण हॉटेलचा युनिफॉर्म घालून ग्राहकांचे टोमणे आणि अपमान सहन करतानाही, संग्राम यांच्या डोळ्यांसमोर मात्र 'खाकी वर्दी'चं स्वप्न लख्ख होतं. हॉटेलमधील धावपळीची ड्युटी संपली की, थकवा झटकून ते थेट लायब्ररी गाठायचे आणि पहाटेपर्यंत पुस्तकात डोकं खुपसून बसायचे.
advertisement
हॉटेलमध्ये काम करत असतानाच त्यांनी पहिली पायरी ओलांडली ती म्हणजे 'पोलीस कॉन्स्टेबल' म्हणून भरती होण्याची. शिपाई म्हणून खाकी अंगावर चढली, पण संग्राम यांचं समाधान झालं नव्हतं. त्यांना अधिकारी बनायचं होतं. ड्युटीचा ताण, बंदोबस्ताची धावपळ आणि त्यात पुन्हा अभ्यासाची कसरत. वेटर म्हणून काम करताना लोकांनी माझ्याकडे ज्या नजरेने पाहिलं आणि आज पोलीस अधिकारी झाल्यावर लोक ज्या आदराने पाहतात, हा जो मधला फरक आहे ना... तोच मला अभ्यासासाठी बळ द्यायचा."
advertisement
२०१७-१८ च्या पीएसआय परीक्षेचा निकाल लागला आणि यादीत 'संग्राम मळकर' हे नाव झळकलं. जो मुलगा कालपर्यंत लोकांचे ताटं उचलत होता, तो आज महाराष्ट्राच्या कायद्याचं रक्षण करणारा 'खाकी वर्दीतला साहेब' झाला होता. ज्या हॉटेलमध्ये त्यांनी वेटर म्हणून काम केलं, तिथेच जेव्हा त्यांचा जंगी सत्कार झाला, तेव्हा ते दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. त्यांच्या यशाने केवळ त्यांच्या गावाचाच नाही, तर आज संघर्ष करणाऱ्या प्रत्येक ग्रामीण तरुणाचा सन्मान केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 05, 2026 12:36 PM IST
मराठी बातम्या/Success Story/
Success story Sangram Malkar: 35 टक्के मिळाले, गावाकडून आला म्हणून लोक हसायचे आज PSI अधिकारी, वेटर ते PSI प्रवास








