YouTube व्हिडिओवर 50,000 व्ह्यूज आल्यावर किती कमाई होते? येथे पाहा पूर्ण हिशोब
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
YouTube चा वापर स्मार्टफोन वापरणारे सर्वच जण करतात. यावर विविध व्हिडिओ पाहता येतात. यासोबतच आता एंटरटेनमेंट म्हणूनच नाही तर कमाई म्हणूनही अनेकजण यूट्यूबचा वापर करत आहेत. पण कमाई किती होते हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
YouTube वर तुम्ही फक्त व्हिडिओच पाहू शकत नाही. तर तुम्ही या माध्यमातून पैसेही कमावू शकता. सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशावेळी अनेकजण हे यूट्यूबच्या माध्यमातून बक्कळ पैसा कमावत आहेत. तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल तर या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ अपलोड करुन महिन्याला लाखोंची कमाई करु शकता.
advertisement
advertisement
advertisement
तुम्ही सर्व YouTube नियमांचे पालन केले आणि YouTube पार्टनर प्रोग्राम (YPP)चा भाग असाल, तर तुमची कमाई सब्सक्राइबर्स, व्हिडिओ रीच, ऑडियन्स आणि एंगेजमेंट यावर आधारित निश्चित केली जाते. तसंच, असा अंदाज आहे की तुम्ही YouTube वर प्रति 1,000 व्ह्यूजसाठी अंदाजे ₹50-₹200 कमवू शकता. अशा प्रकारे, तुम्ही प्रति 50,000 व्ह्यूजसाठी ₹2,500-₹10,000 कमवू शकता.
advertisement
CPM आणि RPM कडे लक्ष देणे गरजेचे : CPM म्हणजेच Cost Per Mille वर ती अमाउंट असते. जी अॅडव्हरटाइजर प्रत्येक 1,000 अॅड व्ह्यूजसाठी यूट्यूबला देते. हे केंटेंटच्या हिशोबाने वेगवेगळे असू शकते. भारतात हे जवळपास 20-150 रुपयांदरम्यान असते. RPM विषयी बोलायचं झाल्यास, ते Revenue per mille असते. 1,000 व्हिडिओ व्ह्यूजनंतर क्रिएटरला मिळणारी ही रक्कम आहे. CPM मधून यूट्यूबचा हिस्सा कट झाल्यानंतर RPM येते.
advertisement
advertisement
तुमच्या व्हिडिओंची क्वालिटी उच्च दर्जाची असल्याची खात्री करा. उच्च दर्जाचे व्हिडिओ जास्त वेळा पाहिले जातात, ज्यामुळे तुमचा पाहण्याचा वेळ वाढेल. अमेरिका आणि यूके सारख्या देशांमध्ये पाहिले जाणारे व्हिडिओ जास्त महसूल निर्माण करतात. म्हणून, तुमचा कंटेंट जगभरातील प्रेक्षकांसाठी संबंधित आणि समजण्यासारखा आहे याची खात्री करण्याचा प्रयत्न करा.








