advertisement

Kalyan News: कोंडीचं नो टेन्शन! खाली गाड्या अन् वरून मेट्रो सोबतच धावणार, कल्याण-डोंबिवलीत वाहतुकीचा नवा पॅटर्न

Last Updated:

Kalyan News: डबल डेकर कॉरिडॉर संकल्पनेनुसार तळाच्या स्तरावर रस्ता, त्यावर फ्लायओव्हर आणि सर्वात वर मेट्रो मार्गिका असे 3 स्तरांचे बांधकाम केले जाणार आहे.

खाली रस्ता अन् वरून मेट्रो, कल्याण डोंबिवलीत वाहतुकीचा नवा पॅटर्न, वाहतूक कोंडीचा प्रश्नच नाही!
खाली रस्ता अन् वरून मेट्रो, कल्याण डोंबिवलीत वाहतुकीचा नवा पॅटर्न, वाहतूक कोंडीचा प्रश्नच नाही!
कल्याण: कल्याणमधील मेट्रो मार्गिका डबल डेकर पद्धतीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या संदर्भात एमएमआरडीएच्या कार्यालयात नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत वाहतूक आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाच्या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
डबल डेकर कॉरिडॉर संकल्पनेनुसार तळाच्या स्तरावर रस्ता, त्यावर फ्लायओव्हर आणि सर्वात वर मेट्रो मार्गिका असे 3 स्तरांचे बांधकाम केले जाणार आहे. या नव्या पद्धतीमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून भविष्यातील वाढत्या वाहतुकीचाही विचार करण्यात आला आहे. या पद्धतीत कल्याण-तळोजा मेट्रो 12, कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो 14, तसेच ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 या मार्गांचा समावेश आहे. याशिवाय दुर्गाडीमार्गे कल्याण-उल्हासनगर-अंबरनाथ-चिखलोली मार्गिका तसेच शिळफाटा-रांजणोली उन्नत मार्ग आणि वालधुनी ते नेवाळी उन्नत मार्ग हे प्रकल्पही डबल डेकर स्वरूपात विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.
advertisement
दरम्यान, उल्हासनगर शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठीही बैठकीत चर्चा झाली. शहरातील उर्वरित सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली. या बैठकीस महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
advertisement
मेट्रो प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात बीएसयूपी घरांमध्ये स्थलांतरित करण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच 3 क्लस्टर योजनेअंतर्गत नागरिकांना कायमस्वरूपी घरे आणि व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून देण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. कल्याण पूर्वेतील यू-टाइप आणि मलंग रस्त्याच्या कामासाठी आवश्यक जमिनीचे संपादन लवकर पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
याशिवाय ऐरोली-काटई फ्री वेदरम्यान काटई नाका येथील बोगद्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्यावरही भर देण्यात आला. मेट्रो 5 च्या विस्तारीकरणातून चिखलोली ते बदलापूर आणि दुर्गाडी ते टिटवाळा या नव्या मार्गिका प्रस्तावित असून मेट्रो 12 चा विस्तार शिळफाटा ते कळवा-मुंब्रा मार्गे ठाण्यापर्यंत करण्याचाही प्रस्ताव आहे. या सर्व प्रकल्पांमुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुसूत्र होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Kalyan News: कोंडीचं नो टेन्शन! खाली गाड्या अन् वरून मेट्रो सोबतच धावणार, कल्याण-डोंबिवलीत वाहतुकीचा नवा पॅटर्न
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement