advertisement

60 सेकंत 13000 चा स्पीड, जगाला धडकी भरवणारं अमेरिकेनं काढलं अस्त्र, हिरोशिमापेक्षा भयंकर विनाशाची भीती

Last Updated:

इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. अमेरिकेने भारतातून निघालेल्या इराणच्या युद्धनौकेला टॉर्पिडोने उडवलं. कॅलिफोर्नियातून मिनटमॅन III क्षेपणास्त्राची चाचणी केली.

News18
News18
सलग सहाव्या दिवशी देखील इस्रायल अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धसंघर्ष सुरू आहे. हे युद्ध भारताच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे. अमेरिकेनं भारतातून निघालेल्या इराणच्या युद्धनौकेला टॉर्पिडोच्या सहाय्याने उडवलं. इतकंच नाही तर आता अमेरिकेनं आपलं सर्वात घातक आणि विनाशकारी शस्त्र बाहेर काढल्याची माहिती मिळाली आहे. 13 हजार किमी अंतर 60 सेकंदात हे अस्त्र गाठतं. मिडिल ईस्टमध्ये युद्ध सुरू असतानाच अमेरिकेने आपल्या ताकदीचे प्रदर्शन करत जगाचे लक्ष वेधून घेतलं.
कॅलिफोर्नियाच्या समुद्रकिनाऱ्यावरून अमेरिकेने मंगळवारी रात्री उशिरा मिनटमॅन III या डूम्सडे बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा २० पटीने अधिक शक्तिशाली अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे, यावरुन हे क्षेपणास्त्र किती भयानक आहे, याचा अंदाज यावरूनच लावता येईल.
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील वैंडेनबर्ग स्पेस फोर्स बेसवरून रात्री ११ च्या सुमारास हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. हे क्षेपणास्त्र निहत्थे (अण्वस्त्राशिवाय) होते, परंतु त्याने प्रशांत महासागरातील मार्शल बेटांजवळील आपले लक्ष्य अचूक गाठले. 'मिसाइल सिस्टीमची अचूकता आणि सज्जता तपासण्यासाठी' ही चाचणी करण्यात आल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
advertisement
मिडिल ईस्टमध्ये युद्धाचा भडका
ही चाचणी अशा वेळी झाली आहे, जेव्हा संपूर्ण मिडिल ईस्ट युद्धाच्या आगीत होरपळत आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला, ज्यामुळे इराण खवळला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दांत तंबी दिली असून, भविष्यात आणखी मोठे हल्ले करण्याची धमकी दिली आहे. लेबनॉनची राजधानी बेरुतमध्ये इस्रायलने हल्ल्यांचा धडाका लावला असून हिजबुल्लाहला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
advertisement
नेमकं काय आहे हे मिनटमॅन III?
advertisement
हे क्षेपणास्त्र अमेरिकेच्या संरक्षणातील सर्वात जुनं पण सर्वात विश्वासार्ह शस्त्र मानलं जातं. हे जमिनीवरून लाँच केले जाते आणि १३,००० किलोमीटर दूर असलेल्या शत्रूचा खातमा करू शकते. याला 'मिनटमॅन' का म्हणतात? कारण हे क्षेपणास्त्र अवघ्या एका मिनिटात लाँच करण्यासाठी सज्ज होऊ शकते. अमेरिका आपल्या अण्वस्त्र 'ट्रायंगल' (जमीन, समुद्र आणि हवा) चा भाग म्हणून अशा ४०० क्षेपणास्त्रांचा वापर करते. रशिया आणि चीनसारख्या देशांना रोखण्यासाठी हे एक प्रमुख शस्त्र आहे.
advertisement
अमेरिकेने ही चाचणी नियमित असल्याचे म्हटले असले तरी, ज्या वेळेत ही चाचणी झाली आहे, त्यामुळे इराण आणि रशियासारख्या देशांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अमेरिकेला केवळ हेच दाखवायचे आहे की, जर त्यांच्यावर कोणी अणुहल्ला करण्याचा विचार केला, तर प्रतिहल्ला करण्यासाठी ते एका मिनिटात सज्ज आहेत.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
60 सेकंत 13000 चा स्पीड, जगाला धडकी भरवणारं अमेरिकेनं काढलं अस्त्र, हिरोशिमापेक्षा भयंकर विनाशाची भीती
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement