Weather Alert: महाराष्ट्र तापला, त्यात नव्या संकटानं वाढवलं टेन्शन, 5 मार्चला 'या' जिल्ह्यांना अलर्ट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात उष्णतेचा पारा चढलेला असतानाच कोकणात वेगळाच अलर्ट देण्यात आला आहे. 5 मार्चचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. महाराष्ट्रात तापमानाचा पारा 38 अंशांच्या पार गेला आहे. उष्ण, कोरडे आणि काही ठिकाणी दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. 5 मार्च रोजी राज्यातील बहुतांश भागात अवकाळी पावसाची शक्यता नाही. मात्र, काही भागात उष्णतेत मोठी वाढ होण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांना उष्ण आणि आद्र हवामानासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. गुरुवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
कोकणात सध्या विचित्र हवामान स्थिती निर्माण झाली असून नागरिकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण आणि दमट हवामान असून रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना आज उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट जारी केला आहे. कमाल तापमान 32-37 अंशांवर गेलं असून किमान 24-27 अंशांपर्यंत राहील. कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
मध्य महाराष्ट्रातील पुण्यासह इतर जिल्ह्यांत तापमानाचा पारा चढला आहे. कमाल तापमान 34-38 अंशांपर्यंत राहील. तर किमान तापमान 20-24 अंशांपर्यंत नोंदवले जाईल. तापमानात हळूहळू वाढ होत असून नागरिकांना दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहेत. मध्य महाराष्ट्रातील काही भागात तुरळक हलक्या पावसाची शक्यता असली तरी बहुतांश भागात मुख्यत: हवामान कोरडे राहील.
advertisement
advertisement
मराठवाड्यातील नागरिकांना उष्ण आणि कोरड्या हवामानाने हैराण केले आहे. छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव या सर्वच जिल्ह्यांत तापमानात वाढ झाली आहे. कमाल तापमान 35-39 अंश तर किमान 20-24 अंश सेल्सिअसवर राहील. किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जात आहे. हवामान पूर्णपणे कोरडे राहणार असून पावसाची शक्यता नाही.
advertisement
advertisement







