advertisement

Detox Drink : होळीला पोटभर खाल्लं... आता त्रास होतोय? पोटासाठी डॉक्टरांनी सुचवलं 'हे' खास ड्रिंक

Last Updated:
How to digest holi heavy food : होळी नुकतीच पार पडली. होळीचा सण महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रा होळी आणि धुलीवंदन असे दोन सण सलग साजरे केले जात असल्याने घराघरांमध्ये मोठ्या प्रमाणात पक्वान्न आणि गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात.
1/9
तुमच्यापैकी अनेकांनी होळीला गोडधोड आणि तिखट-आंबट पदार्थांचा पोटभरून अस्वाद घेतला असेल. अनेकांनी पुरणपोळी, गुलाब जामून, खीर, कढी, भजे असे अनेक पदार्थ या दोन दिवसांत पोट भरून खाल्ले असतील. जीभेचे चोचले पूर्ण करून झाल्यानंतर आता अनेकांना पोटाच्या समस्या जाणवू लागल्या आहेत. अनेकांच्या पोटात गोंधळ निर्माण झाला आहे.

2/9
तुम्हालाही असा त्रास होत असेल तर हे लक्षात घ्या की वेळोवेळी पोट डिटॉक्स करणं अतिशय गरजेचं असतं. प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टर व्ही.के. पांडे यांनी यावर एक प्रभावी आणि अतिशय सोपा उपाय सांगितला आहे.

3/9
डॉक्टर पांडे यांनी पोटाच्या या समस्यांवर एक पेय सुचवले आहे. तुम्हाला दिवसातून फक्त दोन किंवा तीन वेळा ते दोन किंवा तीन ग्लास प्यायचे आहे. असे केल्यास तुमचे पोट अगदी साफ होईल. डॉ. व्ही. के. पांडे यांनी सांगितले की,
डॉक्टर पांडे यांनी पोटाच्या या समस्यांवर एक पेय सुचवले आहे. तुम्हाला दिवसातून फक्त दोन किंवा तीन वेळा ते दोन किंवा तीन ग्लास प्यायचे आहे. असे केल्यास तुमचे पोट अगदी साफ होईल. डॉ. व्ही. के. पांडे यांनी सांगितले की, "सकाळी उठल्यानंतर तुम्ही सर्वात आधी मधाचे पाणी प्या. यासाठी कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा मध आणि थोडे लिंबू पिळून घ्या. हे ग्लासभर पाणी पिऊन टाका.
advertisement
4/9
हे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते आणि गॅसच्या समस्या दूर करते. याशिवाय तुमच्याकडे कोरफडीची ताजी पानं असतील तर तुम्ही त्याचा गर काढून पाण्यात घालून दुपारी पिऊ शकता. ते कसं बनवायचं हे देखील डॉ. पांडे यांनी सांगितले.

5/9
ते म्हणाले की,
ते म्हणाले की, "एक ताजं कोरफडीचं पान घ्या, त्यातील सर्व गर काढून घ्या आणि त्यात थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. यानंतर त्यात आणखी थोडं पाणी, थोडं लिंबू आणि थोडं काळं मीठ घाला. हे सर्व व्यवस्थित मिसळा आणि प्या. हे पेय तुमचे पोट शांत करण्यास मदत करते. तुम्ही खूप तेल किंवा मसालेयुक्त पदार्थ खाल्ले असतील तर तुम्हाला त्याच्या दुष्परिणामांपासून आराम मिळेल.
advertisement
6/9
यानंतर तुम्ही पुदिन्याचे पाणी पिऊ शकता. ते बनवण्यासाठी दोन किंवा तीन पुदिन्याची पाने घ्या, घरी तुळस असेल तर दोन किंवा तीन तुळशीची पानं त्यात घाला आणि बारीक बारीक वाटून घ्या. त्यानंतर ते  पाण्यात घाला आणि ते पाणी प्या.

7/9
हे पाणी प्यायल्यास तुमचे पोट तुम्हाला थँक यू म्हटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला अगदी आराम वाटेल. हे पाणी प्यायल्यास गॅसची समस्या होणार नाही आणि आजाराची शक्यताही दूर होईल.
हे पाणी प्यायल्यास तुमचे पोट तुम्हाला थँक यू म्हटल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला अगदी आराम वाटेल. हे पाणी प्यायल्यास गॅसची समस्या होणार नाही आणि आजाराची शक्यताही दूर होईल.
advertisement
8/9
डॉ. पांडे म्हणाले की,
डॉ. पांडे म्हणाले की, "तुम्ही सध्या हे तीन पेये सहजपणे घेऊ शकता. विशेष म्हणजे याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. शिवाय तुम्ही हे तिन्ही ड्रिंक घरीच सहज बनवू शकता.
advertisement
9/9
होळीला किंवा कोणत्याही सणात तुम्ही कितीही तेलकट आणि मसालेदार अन्न खाल्ले तरी या पेयात त्या सर्वांचे परिणाम कमी करण्याची क्षमता आहे. तुम्ही दिवसातून दोन किंवा तीन ग्लास हे पेय प्यायले तर तुम्हाला पोटाच्या समस्या जाणवणार नाहीत.
होळीला किंवा कोणत्याही सणात तुम्ही कितीही तेलकट आणि मसालेदार अन्न खाल्ले तरी या पेयात त्या सर्वांचे परिणाम कमी करण्याची क्षमता आहे. तुम्ही दिवसातून दोन किंवा तीन ग्लास हे पेय प्यायले तर तुम्हाला पोटाच्या समस्या जाणवणार नाहीत." (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.)
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement