Mumbai Shopping: सोन्यापेक्षा भारी, कोरियन ज्वेलरी; अवघ्या 30 रुपयांपासून करा खरेदी, मुंबईतलं होलसेल मार्केट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Shopping: या गल्लीत ज्वेलरीची किंमत फक्त 30 रुपयांपासून सुरू होते, त्यामुळे कोरियन ज्वेलरीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी हे मार्केट माहितीच असलं पाहिजे.
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट हे होलसेल खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. बाहेरच्या बाजारात ज्या वस्तू जास्त किमतीत मिळतात, त्या इथे तुलनेने कमी दरात मिळतात. त्यामुळे अनेकजण व्यवसायासाठी लागणारा माल खरेदी करण्यासाठी क्रॉफर्ड मार्केटमध्ये येतात. ज्वेलरी आणि फॅशन अ‍ॅक्सेसरीजच्या बाबतीतही हे मार्केट ओळखीचे ठिकाण आहे.
advertisement
क्रॉफर्ड मार्केटमध्ये जुम्मा मशिदीच्या अगदी समोर असलेल्या गल्लीत कोरियन ज्वेलरी मोठ्या प्रमाणात मिळते. हीच ती गल्ली आहे जिथे ब्रासलेट, नेकलेस आणि अ‍ॅंकलेट्स होलसेल दरात विकले जातात. या गल्लीत ज्वेलरीची किंमत फक्त 30 रुपयांपासून सुरू होते, त्यामुळे कोरियन ज्वेलरीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही खरेदीची जागा ठरते.
advertisement
advertisement
advertisement
मिनिमल चेन नेकलेस, छोटे पेंडंट असलेले नेकलेस, लेयर नेकलेस आणि मोत्याचा टच असलेले नेकलेस इथे उपलब्ध आहेत. यासोबतच अ‍ॅंकलेट्सचाही पर्याय आहे. साध्या चेन अ‍ॅंकलेट्स, मोत्याच्या अ‍ॅंकलेट्स आणि स्टोन अ‍ॅड केलेल्या अ‍ॅंकलेट्स या सगळ्या वस्तू होलसेलमध्ये विकल्या जातात.
advertisement
advertisement






