Sagar Moholkar: जेलमध्ये एकाला संपवलं, गँगरस्टर निलेश घायवळच्याही मारली कानाखाली, गोळीबारात जखमी सागर मोहोळकर आहे कोण?
- Published by:Sachin S
Last Updated:
पुण्यामधील कुख्यात गुंड निलेश घायवळवर भर कुस्तीच्या मैदानात कानाखाली मारणाऱ्या कुख्यात गुंड आणि पैलवात सागर मोहळकर याच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे
पुण्यामधील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या टोळीची संपूर्ण जिल्ह्यात दहशत आहे. पण, त्याच्या दहशतीला न जुमानता भर कुस्तीच्या मैदानात निलेश घायवळच्या कानाखाली मारणाऱ्या कुख्यात गुंड आणि पैलवात सागर मोहळकर याच्यावर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला आहे. गोळीबारात तो जखमी असून रुग्णालयात दाखल केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी तातडीने परिसर नाकाबंदी करत तपास सुरू केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. गोळीबारामागील कारण वैयक्तिक वैर, गँगवॉर की इतर काही, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून करण्यात येत आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं तयार केली आहे. या घटनेमुळे जामखेड तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
गावात दोन कुस्त्यांचे फड एकाच वेळी सुरू झाले होते. एक राजकीय विरोधकांचा फड होता आणि एक सार्वजनिक गावाचा फड होता. राजकीय विरोधकांनी आयोजित केलेल्या फडात बाहेरील पहिलवानाला खेळवलं होतं. गावचा सार्वजनिक कुस्तीचा फड उधळण्यासाठी त्याला अधिकचं बक्षिस दिलं होतं. यात सागरने उडी घेतली आणि कुस्ती लावण्याची मागणी केली.
advertisement
advertisement








