advertisement

Shivneri Bus: ‘शिवनेरी’ संपूर्ण महाराष्ट्रात धावणार, मुंबई-पुण्यानंतर आणखी 10 शहरांचा समावेश, किती ठिकाणी आहे थांबा?

Last Updated:
मुंबई– पुणे महामार्गावर धावणाऱ्या ‘शिवनेरी’ बसबद्दल आता राज्यभर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच मुंबई– पुणे मार्गासोबतच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्येही आता ‘शिवनेरी’ बस धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
1/7
 मुंबई– पुणे महामार्गावर धावणाऱ्या ‘शिवनेरी’ बसबद्दल आता एमएसआरटीसीने अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित बस सेवा आता राज्यभर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच मुंबई– पुणे मार्गासोबतच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्येही आता ‘शिवनेरी’ बस धावणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

2/7
 सन 2002 मध्ये सुरू झालेल्या ‘शिवनेरी’ बसच्या सेवेने वक्तशीरपणा, उत्कृष्ट आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवास या गुणवैशिष्ट्यांमुळे उच्च मध्यमवर्गीय प्रवाशांचा विश्वास जिंकला. इतर बससेवेपेक्षा तिकीटदर थोडे अधिक असतानाही सातत्याने मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे ही सेवा सुरुवातीपासूनच नफ्यात असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली.

3/7
 राज्यभर विस्तारासाठी 200 नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होताच, मुंबई– पुणेप्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांदरम्यानही ‘शिवनेरी’ बसची सेवा सुरू होणार आहे.

4/7
 नाशिक– पुणे, नाशिक– छत्रपती संभाजीनगर, नाशिक– जळगाव– धुळे, पुणे– कोल्हापूर, पुणे– सांगली, पुणे– सोलापूर, नागपूर– चंद्रपूर, नागपूर– अमरावती– अकोला अशा प्रमुख शहरांमध्ये सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतील प्रवाशांना आलिशान, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

5/7
Palghar division ST special buses for Shimga festival
सध्या दादर– स्वारगेट, दादर– शिवाजीनगर, बोरीवली– स्वारगेट, बोरीवली– शिवाजीनगर, ठाणे– स्वारगेट आणि ठाणे– शिवाजीनगर या मार्गांवर पर्यावरणपूरक ई- शिवनेरी बस सेवा सुरू असून प्रवाशांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
6/7
 तिकिटांबद्दल बोलायचे तर, ‘ई- शिवनेरी’ बसचे महिला प्रवाशांना आणि 65 ते 75 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात 50 टक्के सवलत असेल. तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ‘शिवनेरी’ बसचा प्रवास पूर्णपणे विनामूल्य असणार आहे.

7/7
 नवीन 200 बसेसमध्ये प्रवाशांच्या सेवेमध्ये 30 स्लीपर बसेसचाही समावेश केला जाणार आहे. सध्या ज्या मार्गांवर विना-वातानुकूलित स्लीपर बससेवा सुरू आहे, त्या ठिकाणी ‘स्लिपर शिवनेरी’ बस सुरू करून प्रवासी सेवेला अधिक वेगळे रूप दिले जाणार आहे. आरामदायी बेड- कोच सुविधा आणि सुरक्षिततामुळे लांब पल्ल्याचा प्रवास प्रवाशांना अधिकच सोयीचा होतोय.

Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement