T20 World Cup : वर्ल्ड कप इतिहासातील फास्टेस्ट सेंच्युरी! 303 च्या स्ट्राईक रेटने आलं वादळ, कोलकात्यात आफ्रिका बेचिराख!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 170 रनचं आव्हान न्यूझीलंडने 12.5 ओव्हरमध्ये म्हणजेच फक्त 77 बॉलमध्ये एक विकेट गमावून पार केलं.
कोलकाता : टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 170 रनचं आव्हान न्यूझीलंडने 12.5 ओव्हरमध्ये म्हणजेच फक्त 77 बॉलमध्ये एक विकेट गमावून पार केलं, याचसोबत न्यूझीलंडने फायनलमध्येही धडक मारली आहे. न्यूझीलंडचा ओपनर फिन ऍलन याने कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर वादळी शतक झळकावलं आहे.
फिन ऍलनने फक्त 33 बॉलमध्ये 303.03 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 100 रनची ऐतिहासिक खेळी केली. फिन ऍलनच्या या तुफानी शतकामध्ये 8 सिक्स आणि 10 फोरचा समावेश होता. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासातलं हे सगळ्यात जलद शतक आहे. तर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधलं हे तिसरं सगळ्यात जलद शतक आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 170 रनच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंडने पहिल्या ओव्हरपासूनच दक्षिण आफ्रिकेच्या बॉलिंगवर आक्रमण केलं.
advertisement
फिन ऍलनचे विक्रम
टी-20 वर्ल्ड कपमधलं सगळ्यात जलद शतक
टी-20 वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यांमधला सर्वाधिक स्कोअर
टी-20 वर्ल्ड कपच्या नॉक आऊट सामन्यात एका खेळाडूच्या सर्वाधिक सिक्स (8)
संपूर्ण इनिंगमध्ये फक्त 4 डॉट
न्यूझीलंडचे ओपनर फिन ऍलन आणि टीम सायफर्ट यांच्यात 9.1 ओव्हरमध्येच 117 रनची पार्टनरशीप झाली. टीम सायफर्टने 33 बॉलमध्ये 175.76 च्या स्ट्राईक रेटने 58 रन केले, ज्यात 7 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. या विजयासोबतच आता न्यूझीलंडने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. गुरूवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ज्या टीमचा विजय होईल ती टीम न्यूझीलंडविरुद्ध फायनल खेळेल. 8 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे.
advertisement
पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 169/8 वर रोखलं. दक्षिण आफ्रिकेकडून सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मार्को यानसनने अर्धशतक केलं. यानसनने 30 बॉलमध्ये नाबाद 50 रन केले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री, कोले मॅककॉनचिए आणि रचिन रवींद्र यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर लॉकी फर्ग्युसन आणि जिमी निशम यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
Location :
Kolkata,West Bengal
First Published :
Mar 04, 2026 10:19 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : वर्ल्ड कप इतिहासातील फास्टेस्ट सेंच्युरी! 303 च्या स्ट्राईक रेटने आलं वादळ, कोलकात्यात आफ्रिका बेचिराख!








