advertisement

Kolhapur: कोल्हापूरमध्ये गँगवारचा भडका, तरुणावर भर चौकात गोळीबार, घटनेमुळे खळबळ

Last Updated:

इचलकरंजीमधील सांगली रोडवर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये  ओंकार कांबळे नावाचा तरुण जखमी झाली आहे.

News18
News18
ज्ञानेश्वर साळुंखे, प्रतिनिधी
कोल्हापूर :  अहिल्यानगरमध्ये पैलवान सागर मोहोळकर याच्यावर गोळीबाराची घटना ताजी असताना आता कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये गोळीबाराची घटना समोर आली आहे. एका गुन्हेगारावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. जखमी तरुणाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार,  इचलकरंजीमधील सांगली रोडवर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये  ओंकार कांबळे नावाचा तरुण जखमी झाली आहे. ओंकार कांबळे याच्यावर दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबार केल्याानंतर घटनास्थळावरून फरार झाले आहे. ज्या ओंकार कांबळेवर गोळीबार झाला आहे, त्याच्यावर वेगवेगळ्याा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी ओंकार कांबळे याला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं आहं. त्याला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.  गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पण, गँगवार किंवा जुन्या वादातून ही घटना घडली असावी अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.  वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळी भेट देण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
advertisement
पैहलवान गुंडावर गोळीबार 
दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात गुंड आणि पैलवान असलेल्या सागर मोहळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी रात्रीच्या सुमारास गोळीबार केला. हल्लेखोरांनी सागरच्या चेहऱ्यावरच गोळीबार केला.  सागर मोहोळकरची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे.  याच सागरने पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवाळच्या कानाखाली मारली होती. त्यानंतर सागर मोहोळकर हा चर्चेमध्ये आला होता.  अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी तातडीने परिसर नाकाबंदी करत तपास सुरू केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kolhapur: कोल्हापूरमध्ये गँगवारचा भडका, तरुणावर भर चौकात गोळीबार, घटनेमुळे खळबळ
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement