advertisement

T20 World Cup : आठव्या बॉलला एक चूक अन् वर्ल्ड कप गेला, 7 मॅच जिंकलेल्या आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम झाला!

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 170 रनचं आव्हान न्यूझीलंडने 12.5 ओव्हरमध्येच फक्त एक विकेट गमावून पार केलं.

आठव्या बॉलला एक चूक अन् वर्ल्ड कप गेला, 7 मॅच जिंकलेल्या आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम झाला!
आठव्या बॉलला एक चूक अन् वर्ल्ड कप गेला, 7 मॅच जिंकलेल्या आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम झाला!
कोलकाता : टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 170 रनचं आव्हान न्यूझीलंडने 12.5 ओव्हरमध्येच फक्त एक विकेट गमावून पार केलं. फिन ऍलनच्या वादळी शतकामुळे दक्षिण आफ्रिकेने हा सामना एकहाती जिंकला. फिन ऍलनने 33 बॉलमध्ये 303.03 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 100 रन केले, ज्यात 10 फोर आणि 8 सिक्सचा समावेश होता.
फिन ऍलन आणि टीम सायफर्ट या न्यूझीलंडच्या दोन ओपनरनी 9.1 ओव्हरमध्येच 117 रनची पार्टनरशीप केली. सायफर्टने 33 बॉलमध्ये 175.76 च्या स्ट्राईक रेटने 58 रन केले, यात त्याने 7 फोर आणि 2 सिक्स मारल्या.
कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅन्टनर याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर किवी टीमने दक्षिण आफ्रिकेला 20 ओव्हरमध्ये 169/8 वर रोखलं. टी-20 क्रिकेटच्या हिशोबाने हा स्कोअर कमी असल्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर न्यूझीलंडला सुरूवातीलाच धक्के द्यायचं आव्हान होतं, पण यात त्यांना यश आलं नाही.
advertisement
दक्षिण आफ्रिकेची खराब फिल्डिंगही त्यांच्या या पराभवाच्या कारणांपैकी एक ठरली. दक्षिण आफ्रिकेची बॉलिंग सुरू झाल्यानंतर आठव्याच बॉलला त्यांनी फिल्डिंगमध्ये चूक केली. कागिसो रबाडाच्या बॉलिंगवर टीम सायफर्टने हवेमध्ये बॉल मारला, पण विकेट कीपर क्विंटन डिकॉक आणि डेवाल्ड ब्रेविस यांच्यात गोंधळ झाला आणि सायफर्टचा कॅच कोणाच्याच हातात आला नाही.
या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने ग्रुप स्टेजच्या सर्व 4 आणि सुपर-8 मधल्या सगळ्या 3 अशा एकूण 7 मॅच जिंकल्या होत्या. लागोपाठ 7 विजयांसह दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये धडक मारली होती, पण सेमी फायनलमध्येच दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का बसला आणि त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. या सामन्यात न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेला 169 रनवर रोखलं. मॅट हेन्री, रचिन रवींद्र आणि कोले मॅककोनचिए यांना 2-2 आणि लॉकी फर्ग्युसन, जिमी नीशम यांना 1-1-1 विकेट मिळाली. दक्षिण आफ्रिकेकडून सातव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मार्को यानसनने 30 बॉलमध्ये नाबाद 55 रनची खेळी केली. तर डेवाल्ड ब्रेविसने 34 आणि ट्रिस्टन स्टब्जने 29 रन केले.
advertisement
दुसरीकडे न्यूझीलंडने टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरूवार 5 मार्चला दुसरी सेमी फायनल होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारी टीम 8 मार्चला न्यूझीलंडविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपची फायनल खेळेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup : आठव्या बॉलला एक चूक अन् वर्ल्ड कप गेला, 7 मॅच जिंकलेल्या आफ्रिकेचा करेक्ट कार्यक्रम झाला!
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement