advertisement

BMC: मुंबई पालिकेत प्रभाग समितीचा बॉस कोण? मनसे आणि ठाकरे गटातच होणार लढत? संपूर्ण लढतीचं चित्र समोर

Last Updated:

मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. ११ ठिकाणी एकच अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली आहे

 मुंबई महापालिका
मुंबई महापालिका
संकेत वरक, प्रतिनिधी
मुंबई :  मुंबई महानगरपालिकेचा कारभार आताा सुरू झाला आहे. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आता  प्रभाग समितीची निवडणूक पार पडणार आहे. सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेचे काही ठिकाणी बिनविरोध निवडणूक होत आहे. तर काही ठिकाणी मुंबईत लढत होणार आहे. विशेष म्हणजे, पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी  एकत्र निवडणूक लढवली. पण असं असलं तरी तरी जी नॉर्थमध्ये प्रत्यक्षात दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल झाले आहे. त्यामुळे कोण उमेदवारी मागे घेणार की दादरमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार हे पाहण्याचं ठरणार आहे.
advertisement
मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. ११ ठिकाणी एकच अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाली आहे तर ६ ठिकाणी दोन उमेदवार रिंगणात असल्याने मतदान होणार आहे.
कुठे होणार अध्यक्ष बिनविरोध? 
- सी-डी – आकाश पुरोहित (भाजपा)
- के पश्चिम – रोहन राठोड (भाजपा)
- के-दक्षिण/के-उत्तर – प्रकाश मुसळे (भाजपा)
advertisement
- पी-दक्षिण – श्रीकला पिल्ले (भाजपा)
- आर-दक्षिण – लीना देहरकर (भाजपा)
- आर-मध्य/उत्तर – प्रकाश दरेकर (भाजपा)
- एम-पश्चिम – आशा मराठे (भाजपा)
-एन – अश्विनी मते (भाजपा)
- जी-दक्षिण – पद्मजा चेंबूरकर (शिवसेना उबाठा)
- एच-पूर्व/पश्चिम – रोहिणी कांबळे (शिवसेना उबाठा)
- एल – विजेंद्र शिंदे (शिंदे शिवसेना)
advertisement
या प्रभाग समित्यांमध्ये एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने मतदानाची गरज नाही. या ११ पैकी भाजपाचे ८, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २, तर शिवसेना (शिंदे गट) १ अध्यक्ष बिनविरोध होणार आहे.
कुठे होणार थेट निवडणूक? 
या ६ प्रभाग समित्यांमध्ये दोन उमेदवार समोरासमोर असल्याने ५, ६ आणि ९ मार्चला मतदान होणार आहे. यामध्ये,
advertisement
- एबीई – ज्ञानराज निकम (काँग्रेस) विरुद्ध रोहिदास लोखंडे (भाजपा)
- एफ-दक्षिण/उत्तर – मानसी सातमकर (शिवसेना) विरुद्ध श्रद्धा जाधव (शिवसेना ठाकरे गट)
- जी-उत्तर (दादर) – जोसेफ कोळी (शिवसेना ठाकरे गट) विरुद्ध यशवंत किल्लेदार (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)
- पी-उत्तर/पूर्व – अजित रावराणे (राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार) विरुद्ध हैदरअली शेख (काँग्रेस)
advertisement
- एम-पूर्व – खैरनुसा हुसेन (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) विरुद्ध प्रज्ञा सदाफुले (शिवसेना)
- एस आणि टी – साक्षी दळवी (भाजपा) विरुद्ध सुरेश शिंदे (शिवसेना ठाकरे गट)
बरोबरीत शक्यता असलेले प्रभाग कोणते?
- एस (भांडुप) आणि टी (मुलुंड) येथे महायुती आणि ठाकरे गट-आघाडी यांचे संख्याबळ समान असल्याने समसमान मते पडल्यास चिठ्ठीद्वारे अध्यक्ष ठरण्याची शक्यता आहे.  एबीई मध्येही समाजवादी पक्षाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यांनी महायुतीला साथ दिल्यास इतंही बरोबरीत निवड होण्याची शक्यता आहे.
advertisement
बहुतांश ठिकाणी बिनविरोध निवड झाली असली तरी ६ प्रभाग समित्यांमध्ये थेट राजकीय लढत रंगणार आहे. काही ठिकाणी चिठ्ठीवर अध्यक्ष ठरण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC: मुंबई पालिकेत प्रभाग समितीचा बॉस कोण? मनसे आणि ठाकरे गटातच होणार लढत? संपूर्ण लढतीचं चित्र समोर
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement