Chiffon Saree Storage : तुमच्या शिफॉनच्या साड्या वर्षानुवर्षे राहतील फ्रेश आणि सुंदर! फक्त 'हे' 3 हॅक्स करा फॉलो
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
How To Store Chiffon Saree For Longer Time : आपल्या शिफॉनच्या साड्या आपल्या खूप आवडीच्या असतात. तशा सर्वच साड्या आपण सांभाळायचा प्रयत्न करत असतो. मात्र शिफॉनच्या साड्यांची आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला या साड्या कशी सांभाळायच्या याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
शिफॉन साड्या खूप सुंदर असतात. मात्र त्या वर्षानुवर्षे तशाच राहून हेदेखील तितकंच अवघड असतं. शिफॉन खूप नाजूक रेशीम आणि नायलॉन धाग्यांपासून बनतं, ज्यामुळे साड्या ताणल्या जाऊ शकतात, फाटतात किंवा जर काळी पडू शकते. बऱ्याच महागड्या साड्यांची चमक काही काळातच कमी होते. आजच्या या खास टिप्स तुमच्या साड्या सुरक्षित ठेवण्यात तुमची मदत करतील.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सिल्क शिफॉनमध्ये असलेली प्रथिने सिल्व्हरफिश आणि इतर कीटकांना आकर्षित करू शकते. यामुळे बरेच लोक साड्यांमध्ये नॅप्थालीन बॉल्स ठेवतात. पण त्यांची रसायने साड्यांचा रंग फिका करू शकतात. म्हणून वॉर्डरोबच्या कोपऱ्यात देवदार लाकडाचे तुकडे किंवा वाळलेल्या कडुलिंबाच्या पानांचे छोटे गठ्ठे ठेवा. यामुळे किटकॅक दूर राहतील आणि साड्यांचा रंगही.
advertisement
शिफॉनच्या साड्या सुरक्षित ठेवण्यासाठी वाळलेल्या संत्र्याच्या सालीदेखील तुम्ही कपाटात ठेऊ शकता. यामुळेही कीटक दूर राहतात आणि तुमच्या साड्यांना हलका फ्रेश सुगंधही येईल. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)









