Iran US Conflict: ''आता जबर किंमत मोजावी लागणार, आमचं नौदल भारताचे पाहुणे'', युद्धनौकेवरील हल्ल्यानंतर इराण खवळला
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
US submarine Attack Iran Warship: अमेरिकेच्या पाणबुडीने हिंदी महासागरात इराणी फ्रिगेट आयआरआयएस देना वर टॉर्पेडो डागल्यानंतर आंतरराष्ट्रीय तणाव वाढला आहे.
Israel Iran: अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू असताना दुसरीकडे आता पाण्यातही युद्धाच्या ज्वाळा पोहचू लागल्या आहेत. अमेरिकेच्या पाणबुडीने हिंदी महासागरात इराणी फ्रिगेट आयआरआयएस देना वर टॉर्पेडो डागल्यानंतर आंतरराष्ट्रीय तणाव वाढला आहे. हे जहाज भारतात आयोजित करण्यात आलेल्या नौदलांच्या सरावावरून परतत होते. यु्द्धनौकेला जलसमाधी मिळाल्यानंतर इराण चांगलाच खवळला असून हे प्रकरण महागात पडणार असल्याची धमकी अमेरिकेला दिली आहे.
श्रीलंकेजवळ झाला भीषण हल्ला
इराणी युद्धनौकेवर हल्ला श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात झाला. इराणची ही युद्धनौका भारतात आयोजित करण्यात आलेल्या नौदल सरावात (MILAN 2026) सहभागी होऊन परतत होती. यामध्ये सुमारे १३० नाविक होते. अमेरिकन पाणबुडीने अचानक केलेल्या या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले असून अनेक जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेची माहिती होताच श्रीलंकन नौदलाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. यामध्ये काही इराणी नौदलाच्या जवानांचे प्राण वाचवण्यास यश आले.
advertisement
हा आंतरराष्ट्रीय गुन्हा, इराण संतापला....
या घटनेनंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. इराणने या हल्ल्याचा बदला घेण्याचे संकेत दिले असून मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले की, अमेरिकेने इराणच्या किनाऱ्यापासून २००० मैल अंतरावर समुद्रात एक क्रूर कृत्य केले आहे. भारतीय नौदलाचे पाहुणे असणारे जहाज आणि सुमारे १३० खलाशांना घेऊन जाणारे डेना या फ्रिगेटवर आंतरराष्ट्रीय पाण्यात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय हल्ला करण्यात आला. अमेरिकेला आता या घटनेचा पश्चात्ताप होईल, असा इशारा त्यांनी दिला.
advertisement
The U.S. has perpetrated an atrocity at sea, 2,000 miles away from Iran's shores.
Frigate Dena, a guest of India's Navy carrying almost 130 sailors, was struck in international waters without warning.
Mark my words: The U.S. will come to bitterly regret precedent it has set. pic.twitter.com/cxYiI9BLUk
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) March 5, 2026
advertisement
ऐतिहासिक आणि धोकादायक वळण
लष्करी विश्लेषकांच्या मते, अमेरिकेने अनेक दशकांनंतर अशा प्रकारे प्रत्यक्ष हल्ला केल्यामुळे ही घटना अत्यंत गंभीर मानली जात आहे. भारताच्या शेजारीच हिंद महासागरात ही कारवाई झाल्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेवर आणि व्यापार मार्गावरही याचे परिणाम होण्याची शक्यता आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Mar 05, 2026 2:07 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran US Conflict: ''आता जबर किंमत मोजावी लागणार, आमचं नौदल भारताचे पाहुणे'', युद्धनौकेवरील हल्ल्यानंतर इराण खवळला







