advertisement

'धमाक्यांचे आवाज, दारं खिडक्या हलतात', लेकीसोबत दुबईत अडकलीये लारा दत्ता; VIDEO शेअर करत झाली इमोशनल

Last Updated:

लारा दत्ता दुबईत इस्रायल-इराण युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीत आहे. तिनं व्हिडीओ शेअर करत तिथली सद्यपरिस्थिती सांगितली.

News18
News18
बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता सध्या दुबईमध्ये आहे आणि तिथल्या सध्याच्या परिस्थितीबद्दलचा तिचा अनुभव शेअर केला. ती एका नवीन प्रोजेक्टच्या शूटसाठी दुबईत गेली होती. पण इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा परिणाम तिथेही जाणवला. लाराने स्पष्ट केले की गेल्या काही दिवस खूप तणावपूर्ण आणि भयावह होते.
28 फेब्रुवारीची आठवण करून देताना ती म्हणाली की, ती कामात व्यस्त असताना अचानक तिला आकाशात मोठे स्फोट ऐकू आले. तिने मिसाइल्स रोखताना पाहिली जी खरोखरच भयानक होती. एखाद्या चित्रपटातील सीन्ससारखी. लढाऊ विमानांचे आवाज इतके मोठे होते की तिच्या घराच्या खिडक्या आणि दरवाजेही हादरले.
advertisement
लाराने सांगितलं, "गेल्या 3 वर्षांपासून दुबई हेच माझं घर आहे. मी बराच वेळ इथेच घालवते. इस्रायल-इराण युद्ध सुरू झाल्यापासून मी इथेच आहे. ब्रँड शूटसाठी मी दुबईमध्ये होते. त्याच वेळी स्टुडिओच्या वरून स्फोट आणि मिसाइल्सचे आवाज ऐकू आले. आम्ही घाबरून स्टुडिओमधून बाहेर पळालो. मिसाइल्स इंटरसेप्ट होताना प्रत्यक्ष पाहिलं. गेले काही दिवस खूप तणावपूर्ण गेले आहेत. माझे पती महेश कामानिमित्त बाहेर आहेत. आम्ही खूपच घाबरलो आहोत. हे सगळं खूप भयानक आहे. सतत स्फोटांचे आवाज येत आहेत. वरून जेट्स उडताना दिसतात. आम्ही सुरक्षित ठिकाणी राहतो पण स्फोटांमुळे खिडक्या हलू लागतात."
advertisement
advertisement
लाराने यूएई सरकारच्या कामाचं कौतुक केलं. ती म्हणाली, "यूएई सरकार चांगलं काम करत आहे. ते सगळ्यांना योग्य प्रकारे सांभाळत आहेत. जे लोक बाहेर न जाण्याचा पर्याय असूनही देश चालवत आहेत, ती खरोखरच सन्मानाची बाब आहे." हा संपूर्ण प्रसंग सांगताना लारा इमोशनल झाली. ती भारतात येण्यासाठी प्रयत्न करत आहे असंही तिनं सांगितलं. लाराच्या व्हिडीओवर अनेक कलाकारांनी पोस्ट करत तिला धीर दिला आहे.
advertisement
फक्त लारा दत्ता नाही तर अनेक कलाकार सध्या दुबईमध्ये अडकले आहेत. अभिनेत्री सोनल चौहान, ईशा गुप्ता देखील दुबईमध्ये आहेत. सोनल चौहानने पीएम मोदींकडे मदत मागितली होती. ती आता भारतात परत आली आहे. त्याचबरोबर अभिनेता सोनू सूद देखील इतर देशांत अडकलेल्या लोकांना मायदेशी परत आणण्यासाठी मदत करत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
'धमाक्यांचे आवाज, दारं खिडक्या हलतात', लेकीसोबत दुबईत अडकलीये लारा दत्ता; VIDEO शेअर करत झाली इमोशनल
Next Article
advertisement
Iran War Cost: 71,71,47,40,000  प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार, महत्त्वाच्या गोष्टीचा 'लिमिटेड' साठा
71,71,47,40,000 प्रत्येक दिवसाचा खर्च; इराणमध्ये अमेरिकेचा खेळ खल्लास होणार
  • युद्धाची किंमत कल्पनेपलीकडे!

  • इराणमध्ये अमेरिका अडकली डेथ ट्रॅपमध्ये

  • एका दिवसात 6,500 कोटी खाक

View All
advertisement