घरात रात्री एकटी झोपली होती, ‘तो’ आला अन् 80 वर्षांच्या वृद्धेसोबत भयंकर कृत्य, छ. संभाजीनगरात संताप
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajiangar: पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तातडीने कारवाई करत आरोपी शेख रमजान याला ताब्यात घेतले.
छत्रपती संभाजीनगर: मानवतेलाच काळिमा फासणारा प्रकार छत्रपती संभाजीनगरातून पुढे आला आहे. सोयगाव तालुक्यातील एका गावात अत्यंत संतापजनक घटना घडली. घरात एकटी झोपलेल्या 80 वर्षाच्या वृद्धेवर एका 54 वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी पीडितेच्या नातीने दिलेल्या फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख रमजान शेख महमूद (वय 54) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्री आपल्या घरात एकटी झोपलेली असताना आरोपी शेख रमजान याने घरात प्रवेश करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार शुक्रवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या नातीने सोयगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
advertisement
दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत तातडीने कारवाई करत आरोपी शेख रमजान याला शुक्रवारी सायंकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास अटक केली. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगर येथील न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन आरेकर व त्यांच्या पथकाकडून सुरू आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 07, 2026 11:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
घरात रात्री एकटी झोपली होती, ‘तो’ आला अन् 80 वर्षांच्या वृद्धेसोबत भयंकर कृत्य, छ. संभाजीनगरात संताप









