मामा कसला, हा तर शैतान, बहिणीला भेटायला आला अन् गरोदर सूनेवरच..., कोर्टानं घवडवली जन्माची अद्दल!
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajiangar: पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
छत्रपती संभाजीनगर: महिला आणि मुलींवरील अत्याचाराचे वाढते प्रकार हे समाजाची चिंता वाढवणारे असून या प्रकरणात कडक कारवाईची गरज व्यक्त केली जातेय. छत्रपती संभाजीनगरमध्ये अशाच एका प्रकरणात न्यायालयाने दोघांना जन्माची अद्दल घडवली. अल्पवयीन आणि गर्भवती सुनेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात दोघांना 20 वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी 37 हजारांच्या दंडाची शिक्षा झाली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी ही शिक्षा सुनावली.
छत्रपती संभाजीनगरच्या देवगाव रंगारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात 14 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी ही घटना घडली होती. पीडित मुलगी ही तेव्हा 17 वर्षे 9 महिन्यांची होती. संबंधित समाजाच्या प्रथेनुसार तिचा 2022 मध्येच बालविवाह झाला होता, असे तक्रारीत नमूद आहे.
advertisement
घटनेच्या दिवशी सकाळी पीडितेचा पती आणि सासरे मोसंबी तोडणीच्या कामासाठी बाहेर गेले होते. घरात पीडिता आणि तिची सासू एवढ्याच दोघी होत्या. सासू मानसिक आजाराने त्रस्त असल्यामुळे तिची विचारपूस करण्यासाठी तिचा भाऊ, म्हणजेच पीडितेचा मामे सासरा, तसेच त्याचा मेहुणा घरी आले होते. यावेळी गरोदर पीडिता एकटी घरी असल्याची संधी साधून त्यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
advertisement
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी पीडितेने देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास केल्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल करण्यात आले. सुनावणी दरम्यान सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवत 20 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम भरण्याचेही आदेश दिले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 11:37 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मामा कसला, हा तर शैतान, बहिणीला भेटायला आला अन् गरोदर सूनेवरच..., कोर्टानं घवडवली जन्माची अद्दल!






