advertisement

Inadequate sleep : सतत आजारी पडण्याचा अपुऱ्या झोपेशी काय संबंध ? झोप पूर्ण झाली नाही तर शरीरावर काय परिणाम होतात ?

Last Updated:

चांगल्या प्रकृतीसाठी हवी चांगली झोप. पण चिंता आणि झोपेचा अभाव यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. झोप म्हणजे शरीराची ढाल असते. झोप पूर्ण झाली नाही तर या संरक्षणाविना शरीराचं नुकसान होतं. निद्रानाश आणि चिंता थेट आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतात, शक्ती कमकुवत करतात आणि यामुळे आपल्याला आजार होण्याची शक्यता जास्त असते असं अलिकडच्या एका अभ्यासातून स्पष्ट झालंय. 

News18
News18
मुंबई : सतत आजारी पडत असाल तर ही माहिती महत्त्वाची. बाह्य कारणांप्रमाणेच तुमच्या शरीराच्या आत काय सुरु असतं याचा प्रकृतीवर थेट परिणाम होतो.
चांगल्या प्रकृतीसाठी हवी चांगली झोप. पण चिंता आणि झोपेचा अभाव यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. झोप म्हणजे शरीराची ढाल असते. झोप पूर्ण झाली नाही तर या संरक्षणाविना शरीराचं नुकसान होतं. निद्रानाश आणि चिंता थेट आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतात, शक्ती कमकुवत करतात आणि यामुळे आपल्याला आजार होण्याची शक्यता जास्त असते असं अलिकडच्या एका अभ्यासातून स्पष्ट झालंय.
advertisement
तैबा विद्यापीठाचे महत्त्वाचं संशोधन - सौदी अरेबियातील तैबा विद्यापीठातील संशोधकांनी या विषयावर एक महत्त्वाचा अभ्यास केला. त्यात निद्रानाश आणि चिंताग्रस्त 60 तरुणींचा समावेश होता. त्यांच्या रक्ताचे नमुने पूर्णपणे तपासण्यात आले आणि निकाल खूपच आश्चर्यकारक होते.
advertisement
चिंता आणि झोपेच्या कमतरतेबद्दल धक्कादायक आकडेवारी - अभ्यासातील 75 टक्के तरुणींना काही प्रमाणात चिंता होती. त्यापैकी पन्नास टक्क्यांहून अधिक महिलांना निद्रानाश किंवा झोप न येण्याची तक्रार होती.
जेव्हा त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यात आलं तेव्हा असं आढळून आलं की या समस्यांनी ग्रस्त असलेल्या महिलांची प्रतिकारशक्ती सामान्य लोकांच्या तुलनेत खूपच कमी झाली आहे असं या संशोधकांनी निष्कर्षात म्हटलंय.
advertisement
चिंता आणि निद्रानाश शरीराला इतकं कमकुवत का करतात याचं कारण म्हणजे 'Natural killer cell' कमी होणं. या पेशी आपल्या शरीरात संरक्षक किंवा सैनिक म्हणून काम करतात. त्यांचं प्राथमिक कार्य रोग निर्माण करणारे जंतू आणि संक्रमित पेशी शोधणं आणि नष्ट करणं आहे.
advertisement
अभ्यासानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीला निद्रानाश किंवा चिंतेची लक्षणं दिसतात तेव्हा त्यांच्या शरीरात आणि रक्तात फिरणाऱ्या या 'Natural killer cell'ची एकूण संख्या झपाट्यानं कमी होते. या संरक्षणात्मक पेशींमधे घट झाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, ज्यामुळे ते आजारांना अधिक संवेदनशील बनते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Inadequate sleep : सतत आजारी पडण्याचा अपुऱ्या झोपेशी काय संबंध ? झोप पूर्ण झाली नाही तर शरीरावर काय परिणाम होतात ?
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement