Surya-Shani Yuti: सूर्य-शनिची युती झाल्यानं 4 राशींची गणितं बिघडणार; 15 मार्चनंतर खडतर काळाचा सामना कराल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology: सूर्य आणि शनि यांच्यात पिता-पुत्राचे नाते असले तरी ज्योतिषशास्त्रात त्यांना एकमेकांचे शत्रू मानले जाते. त्यामुळे जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत एकत्र येतात (युती करतात), तेव्हा काही लोकांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. 15 मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करणार असून तिथे आधीच शनि विराजमान आहे. सूर्य-शनिची ही युती एप्रिलच्या मध्यापर्यंत राहील. या युतीचा प्रतिकूल प्रभाव कोणत्या राशींवर पडू शकतो, ते जाणून घेऊया.
मेष - सूर्य-शनिची युती तुमच्या 12 व्या घरात होणार आहे. या युतीमुळे तुम्हाला करिअरच्या क्षेत्रात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, विशेषतः जे लोक परदेशी कंपन्यांमध्ये काम करतात किंवा ज्यांचा व्यवसाय परदेशाशी निगडित आहे. तुम्हाला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. वैवाहिक आयुष्यातही चढ-उतार येऊ शकतात, त्यामुळे जोडीदाराशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा. आर्थिक परिस्थिती नीट ठेवण्यासाठी योग्य बजेट बनवून चालणे गरजेचे आहे.
advertisement
सिंह - तुमच्या राशीपासून 8 व्या घरात सूर्य आणि शनिची युती होईल. या युतीमुळे तुमच्या आत्मविश्वासात कमतरता जाणवू शकते. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य हा शनि ग्रहासोबत असल्यामुळे कमकुवत अवस्थेत असेल. या काळात पैशांशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेऊ नका, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना आपले प्रयत्न वाढवावे लागतील, तर नोकरी करणाऱ्यांनी कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे. चुकीच्या संगतीपासून दूर राहणे तुमच्या फायद्याचे ठरेल.
advertisement
तूळ - सूर्य-शनिच्या युतीमुळे तुमचे शत्रू सक्रिय होऊ शकतात. त्यामुळे या काळात कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका; एखादी जवळची व्यक्तीच तुम्हाला धोका देऊ शकते. कामाच्या ठिकाणी चालणाऱ्या राजकारणापासून स्वतःला दूर ठेवले तरच तुम्ही फायद्यात राहाल. विनाकारण होणारा खर्च टाळा, नाहीतर आर्थिक गणिते बिघडू शकतात. काल्पनिक जगात जगण्यापेक्षा वास्तवाचे भान ठेवून वागलात तरच आयुष्यात सुधारणा दिसून येईल.
advertisement
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांचा साठवलेला पैसा एखाद्या अनावश्यक कारणामुळे खर्च होऊ शकतो. ज्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे, त्यांनी प्रत्येक पाऊल जपून टाकणे गरजेचे आहे, अन्यथा नुकसान सोसावे लागेल. प्रवासादरम्यान सावध राहा, एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची भीती आहे. करिअरच्या बाबतीत तुमचा एखादा चुकीचा निर्णय तुम्हाला अडचणीत टाकू शकतो, त्यामुळे सावध राहा. आरोग्याबाबतच्या चिंताही वाढू शकतात, त्यामुळे स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या.
advertisement
सूर्य-शनि युतीचे अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी उपाय - आई-वडिलांची सेवा केल्याने सूर्य-शनि युतीचे वाईट प्रभाव कमी होतात. मंगळवार, शनिवार आणि रविवारी हनुमान चालीसाचे पठण करा. सूर्यदेवाला रोज अर्घ्य अर्पण करा (पाणी चढावा). काळ्या कुत्र्याला पोळी खायला दिल्याने या युतीचे नकारात्मक परिणाम दूर होण्यास मदत होते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)








