advertisement

IND vs ENG : '100 टक्के बॉल स्विंग होणार...', सूर्याला हिंट दिली, रोहित शर्माने मोर्कलला आधीच सांगितलं होतं वानखेडेवरचं 'सिक्रेट'

Last Updated:

Rohit Sharma Advice On Wankhede Wind : इंग्लंडविरुद्धच्या टीम इंडियाच्या विजयात रोहित शर्माचा मोठा वाटा राहिला आहे. त्याचा व्हिडीओ आयसीसीने आता शेअर केला आहे.

Rohit Sharma Gives Advice to morne morkal
Rohit Sharma Gives Advice to morne morkal
Rohit Sharma Massage to Morne Morkal : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. वानखेडेवर झालेल्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये सामन्यात टीम इंडियाने जोरदार झुंज देत मॅच नावावर केली आहे. रोमांचक सामन्यात टीम इंडियाने 7 रन्सने विजय मिळवला. पण टीम इंडियाच्या विजयात रोहित शर्माचा मोठा वाटा राहिला आहे. त्याचा व्हिडीओ आयसीसीने आता शेअर केला आहे. यामध्ये रोहितने असा काही सल्ला दिला की, टीम इंडियाला याचा फायदा झाला.

इंजिन खूप स्मूथ आहे भाई...

सूर्यासोबत बोलताना रोहित शर्मा म्हणतो, डू इट... इंजिन खूप स्मूथ आहे भाई... मोठा स्कोर केला तर चेस होईल का? असा सवाल रोहितला सूर्याने विचारला. मग काय तर... लास्ट मॅचमध्ये पण एवढा भारी स्कोर चेस केला होता, असं रोहित शर्मा सूर्याला म्हणताना दिसतोय. त्यानंतर रोहित शर्माने टीम इंडियाचा बॉलिंग कोच मोर्ने मॉर्कल याची भेट घेतली. त्यावेळी रोहितने मोर्कलला एक सल्ला दिला.
advertisement












View this post on Instagram























A post shared by ICC (@icc)



advertisement

100 टक्के बॉल स्विंग होईल

रोहित शर्माने मोर्ने मॉर्कल याला वानखेडेवरची अशी गोष्ट सांगितली, ज्याच्या जोरावर टीम इंडियाने मॅच जिंकली. वानखेडेवर हवा वाहतीये... त्यामुळे बॉलला काहीसा स्विंग मिळेल. पहिल्या इनिंगमध्ये नाही तर आपण दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग करेल तेव्हा देखील स्विंग मिळेल, हे लक्षात ठेवा. 100 टक्के बॉल स्विंग होईल कारण वानखेडेवरची ही हवा थांबत नसते, असंही रोहित शर्मा यावेळी म्हणताना दिसला. आयसीसीने याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
advertisement

प्रेक्षकांना मॅचचा नूर समजला अन्...

दरम्यान, रोहित शर्माने वानखेडेवर आल्यावर टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार, इशान किशन, मोहम्मद सिराज आणि इंग्लंडच्या खेळाडूंची देखील भेट घेतलीये. मॅच हातातून जात असताना वानखेडेवर कमाल झाली. प्रेक्षकांनी स्टेडियम डोक्यावर घेतलं. वानखेडेवर प्रेक्षकांनी टीम इंडियाचा जयजयकार सुरू केला. मुंबईला क्रिकेटचा मोठा वारसा लाभला असल्याने प्रेक्षकांना मॅचचा नूर समजला होता. प्रेक्षकांनी जोरदार सपोर्ट केल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंनी जोश दाखवला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : '100 टक्के बॉल स्विंग होणार...', सूर्याला हिंट दिली, रोहित शर्माने मोर्कलला आधीच सांगितलं होतं वानखेडेवरचं 'सिक्रेट'
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement