advertisement

आता पाय धुवून पाणी पिऊ का? अनुश्री आणि संस्कृतीमध्ये वादाचा भडका, कॅप्टन राखी ओतणार तेल!

Last Updated:

अनुश्री आणि संस्कृती यांच्यातील वाद शांत करण्याऐवजी राखी या वादात आणखी तेल ओतणार का? हे पाहणं आजच्या एपिसोडमध्ये इंट्रेस्टिंग ठरणार आहे.

News18
News18
Bigg Boss Marathi 6 च्या घरात पुन्हा एकदा जोरदार वाद पाहायला मिळणार आहे. घरात कॅप्टन बनल्यानंतर राखीसमोर पहिल्याच दिवशी सदस्यांमधील भांडण सोडवण्याची वेळ येणार आहे.  यावेळी घरातील कामांच्या वाटपावरून अनुश्री आणि संस्कृती यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय की, घरातील ड्युटीबाबत अनुश्री राखीला सांगते, "ड्युटी आहे ना माझी ती मी एकटी नाही करू शकत." त्यावर कॅप्टन राखी तिला म्हणते, "पाच बाथरूम ही ( संस्कृती ) एकटी मुलगी धुते." राखीचं बोलणं ऐकल्यानंतर अनुश्री म्हणते की, "बाथरूम धुणं हे एवढं मेहनतीचं काम नाहीये. आपले बाथरूम एवढे एवढेशे आहेत."
advertisement
अनुश्रीच्या या बोलण्यामुळे संस्कृतीला राग येतो आणि ती लगेच म्हणते, "मग तू कर. तिला बाथरूम मेहनतीचं काम नाही वाटत, मग ती बाथरूमपण करेल आणि तेपण करेल. मी काहीच करणार नाही." संस्कृतीच्या या वक्तव्यामुळे वातावरण आणखी तापतं. संस्कृतीच्या बोलण्यावर अनुश्रीलाही राग अनावर होतो. ती चिडून म्हणते, "काय काय करू अजून? पाय धुवून पाणी पिऊ का?" तिच्या या वक्तव्यामुळे घरात क्षणभर शांतता पसरते.
advertisement
या सगळ्या वादात घराची कॅप्टन असलेली राखी आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अनुश्री आणि संस्कृती यांच्यातील वाद शांत करण्याऐवजी राखी या वादात आणखी तेल ओतणार का? हे पाहणं आजच्या एपिसोडमध्ये इंट्रेस्टिंग ठरणार आहे.



 










View this post on Instagram























 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)



advertisement
घरातील कामांचं वाटप हा नेहमीच संवेदनशील मुद्दा राहिला आहे. त्यामुळे आता बाथरूम साफ करण्याची जबाबदारी शेवटी कोण घेणार, आणि या वादाचा शेवट कसा होणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरणार आहे.
मागील एपिसोडमध्ये राखीला सगळ्यांनी कॅप्टन केलं. राखीनं वायरिंगचा टास्क जिंकला आणि राखी दहाव्या आठवड्यात घराची कॅप्टन झाली. कॅप्टन होण्याआधीच राखीनं सगळ्यांना वॉर्निंग दिली. मी कॅप्टन झाली तर सगळ्यांचा बँड वाजवणार जो तुम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवणार. कॅप्टन झाल्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी प्रभू झोपलेला असतो. कोंबडा वाजतो. राखी त्याला कोंबडा बनवते आणि सगळ्यांना हिच शिक्षा आहे असं सांगते.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
आता पाय धुवून पाणी पिऊ का? अनुश्री आणि संस्कृतीमध्ये वादाचा भडका, कॅप्टन राखी ओतणार तेल!
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement